Pro Kabaddi 
क्रीडा

Pro Kabaddi: प्रो कबड्डीच्या 11 व्या हंगामाच्या ऑक्शनची तारीख ठरली! कुठे पाहता येणार लाईव्ह?

Pro Kabaddi: प्रो कबड्डी लीगच्या खेळाडूंच्या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस क्रिडा वाहिन्यांवरून आणि डिस्ने प्लस हॉट स्टार ओटीटी चॅनलवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

प्रो कबड्डी लीग स्पर्धा उद्या 26 जुलै 2024 रोजी आपला १० वा वर्धापनदिन साजरा करत आहे. मशाल स्पोर्टस या प्रमुख आयोजकांना पीकेएलच्या ११ व्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव मुंबई येथे 15 व 16 ऑगस्ट रोजी हा लिलाव पार पडणार आहे.

मुंबई येथे सुरू झालेला प्रो कबड्डी लीगचे १० वे सत्र यशस्वी पार पडले आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धा तब्बल १० मोसम पूर्ण करणारी भारतातील केवळ दुसरीच स्पोर्टस लीग स्पर्धा ठरलीय. दरम्यान मशाल स्पोर्टसच्या वतीने प्रो कबड्डी लीगच्या ११व्या मोसमासाठी नव्या बोध चिन्हांचे अनावरण करण्यात आलंय. या बोध चिन्हात भारतीय राष्ट्रध्वजाच्या भगव्या आणि हिरव्या रंगाची संगती साधण्यात आलीय. त्यामुळे कबड्डी हा भारताचा प्रमुख असल्याचे अधोरेखित झाल्याचं प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले.

प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलंय. अतिशय अभिमान वाटत आहे. गेल्या अनेक शतकांपासून भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य दाखवणारा वैशिष्ट्यपूर्ण खेळ असलेल्या कबड्डीचे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक खेळ म्हणून प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात आल्याची माहिती गोस्वामी यांनी दिली.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सर्व गुंतवणूकदार, प्रायोजक आणि अखिल भारतीय कबड्डी महासंघांशी संलग्न असलेले सर्व घटक यांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. ११व्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव करताना एक खास कार्यक्रम सादर करून आम्ही गाठलेला हा टप्पा साजरा करण्याचा आमचा मनोदय असल्याचं गोस्वामी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT