Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शहीदांना अनोखी श्रद्धांजली; २१० किमी अंतर केलं धावत पार

Meri Mati Mera Desh Yojna: स्वातंत्र्यदिनानिमत्ताने आणि मेरी माटी,मेरा देश या केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत एक खास मोहीम राबवण्यात आली आहे.
vedanta college vitthalwadi
vedanta college vitthalwadi saam tv
Published On

August Kranti Daud Vitthalwadi: भारतात ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या खास दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आणि मेरी माटी,मेरा देश या केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत एक खास मोहीम राबवण्यात आली आहे.

ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत वेदांता कॉलेज,विठ्ठलवाडीतील १९ विद्यार्थी आणि १ क्रीडा शिक्षक (शिवराज बेन्नूरकर) यांनी तोरणा किल्ला ते वेदांता कॉलेज विठ्ठलवाडी असे एकूण २१० किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले आहे.

vedanta college vitthalwadi
IND VS WI 5th T20I: मास्टरमाईंड शेफर्ड! सूर्या अन् संजूला बाद करण्यासाठी असा रचला सापळा; सामन्यानंतर सांगितला काय होता प्लान

या दौडमध्ये अश्विनी पाटील, समीक्षा चौधरी, सुनीता पाटील, कावेरी कदम, रितू पाटील, साक्षी साळवी, महिरा इलियास, निकिता राठोड, सागर झाडे, विरल गला, विपुल राम,अभय झाडे, राज गांगुर्डे, विशाल निषाद, तुषार शिरसाठ, गौरव चव्हाण,ओमकार दमाले,असिफ नदाफ, शिवकुमार शर्मा आणि क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिवराज बेंन्नुरकर या सर्वांनी मिळून दौड पूर्ण केली त्याच बरोबर सपोर्ट टीम (बाइकर्स)म्हणून उदित वायंगणकर, शैजु अब्रहिम,शमशाद शेख, सिद्धांत बागुल,समर्थ अप्राज,विशाल गुप्ता, युवराज बेंन्नुरकर आणि एन. एन. एस (पी.ओ) विजय सक्सेना यांचा समावेश होता. (Latest sports updates)

vedanta college vitthalwadi
IND vs IRE: कर्णधार, उपकर्णधारासह संपूर्ण संघ बदलणार! आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

या दौडसाठी वेदांता फाउंडेशन आणि वेदांता कॉलेजचे प्राचार्य डॉ. संगीता कोहली आणि उपप्राचार्य डॉ. किरण मेंघानी, डॉ सी.ए. विश्वनाथन अय्यर व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि सहकार्य करत मुलांना प्रोत्साहित केले तसेच स्पोर्ट्स कमिटी, एन.एस.एस. युनिट, डी एल एल इ युनिटच्या सर्व विद्यार्थ्यांनी ही खूप मदत केली.

दौड पूर्ण झाल्यावर उल्हासनगर महानगरपालिकेचे (प्रशासक तथा आयुक्त) मा. श्री. अजीज शेख, डॉ. करुणा जुईकर (अतिरिक्त आयुक्त (सेवा) आणि मा. श्री. जमीर लेंगरेकर तसेच इतर मान्य वरानी खेळाडूंचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com