pro kabaddi  saam tv news
क्रीडा

Pro Kabaddi Season 10: यु मुंबा अन् पुणेरी पलटण यांच्यातील चुरशीची लढत बरोबरीत

Ankush Dhavre

Pro Kabaddi News:

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यु मुंबा आणि पुणेरी पलटण या महाराष्ट्रातीलच दोन संघांनी आपल्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ करताना महत्वाच्या टप्प्यावर झालेली लढत ३२-३२ अशी बरोबरीत सोडवली. यु मुंबा संघाकडून गुमान सिंगने चढाईत १५ गुण मिळवताना संपूर्ण लढतीवर वर्चस्व गाजवले. तर, मोहम्मद रेजा शादलुईने सहा पकडी करताना लक्षवेधी कामगिरी केली.

गच्चीबाऊली इंडोर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तत्पूर्वी अस्लम इनामदारने चढाईत सलग गुण टिपल्यामुळे पुणेरी पलटण संघाला तिसऱ्याच मिनिटाला ४-२ अशी आघाडी घेता आली. संकेत सावंतने हैदर अली आणि गुमान सिंग यांच्या पकडी करून ही आघाडी वाढवली. दरम्यान एकरामीने गौरव खत्रीची पकड करून मुंबाची पिछाडी ५-७ अशी कमी केली.

दोन्ही संघ समतोल कामगिरी करत असताना पुणेरी पलटण संघाने १३व्या मिनिटापर्यंत १०-७ अशी आघाडी राखली होती. मात्र गुमान सिंगच्या सुपर रेड मुळे यु मुंबाने पुणेरी पलटण संघावर पहिला लोन चढवून घेतलेली १५-११ अशी आघाडी यु मुंबा संघाने मध्यंतरापर्यंत १९-१७ अशी कायम राखली. (Kabaddi News In Marathi)

मोहित गोयतच्या अप्रतिम चढाईमुळे पुणेरी पलटण संघाने झुंज दिल्यानंतरही मुंबा संघाने २१-१९ अशी आघाडी राखली होती. मात्र गोयतच्या चमकदार कामगिरी मुळे पुणेरी पलटण संघाने यु मुंबावर लोन चढवून २७ व्या मिनिटाला२५-२३ असे पुनरागमन केले. तरीही गुमान सिंगच्या चढाया मुळे यु मुंबाने २६-२६ व ३०-३० अशी बरोबरी साधत चुरस कायम राखली.

मोहित गोयतने केवळ ५० सेकंद बाकी असताना पुणेरी पलटण संघाला ३२-३१ अशी विजयाची संधी मिळवून दिली होती. परंतु राणेने बोनस गुण टिपताना अखेरच्या क्षणी यु मुंबा संघाला ३२-३२ अशी बरोबरी साधून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT