pro kabaddi saam tv news
Sports

Pro Kabaddi News: हरियाणा स्टीलर्सला पुणेरी दणका! मोहित गोयतच्या शानदार कामगिरीमुळे हरियाणाचा एकतर्फी पराभव

Puneri Paltan vs Haryana Steelers: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने हरियाणा स्टीलर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक असा सामना पाहायला मिळाला आहे

Ankush Dhavre

Puneri Paltan vs Haryana Steelers, Pro Kabaddi:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने हरियाणा स्टीलर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक असा सामना पाहायला मिळाला आहे. या सामन्यात पुणेरी पलटण संघाने हरियाणा स्टीलर्स संघाचा 51-36 असा पराभव करून पराभवाची परतफेड केली. या सामन्यात मोहित गोयत हा पुणेरी पलटण संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे.

ताऊ देवीलाल इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत आकाश शिंदेने सुरेख खेळ करत पुणेरी पलटण संघाला दमदार सुरुवात करुन दिली. हरियाणाच्या पंकज मोहितेने सुपर टॅकल करून संघावर लोन चढवण्यापासून वाचवले. पण पुणेरी पलटण संघाने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत हरियाणा संघावर 10व्या मिनिटाला पहिला लोन चढवून 12-7 अशी आघाडी घेतली.

त्यानंतर दोनच मिनिटांनी हरियाणा संघाच्या विनयने पुणेरी पलटणच्या अबिनेश नदराजन, पंकज मोहिते, गौरव खत्रीला बाद करत संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 14व्या मिनिटाला शादलुईने विनयला बाद करून पुणेरी पलटण संघाला 19-16 अशी आघाडी मिळवून दिली. 17व्या मिनिटाला पुणेरी संघाच्या मोहितने सुपर रेड करत हरियाणा संघावर दुसरा लोन चढवून ही आघाडी 29-18 अशी वाढवली. (Kabaddi News in marathi)

उत्तरार्धात हरियाणा संघाने जोरदार खेळ केला, पण पुणेरी पलटणच्या मोहितने हे आव्हान परतावून लावले. मोहितने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत 27व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघाने हरियाणा संघावर तिसरा लोन चढवून 39-22 अशी भक्कम आघाडी घेतली.

हरियाणाच्या मोहित नंदलने गुण मिळवून देत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण पुणेरी पलटण संघाने आपला दबदबा कायम ठेवत हरियाणा संघावर 51-36 असा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT