pro kabaddi  saam tv news
Sports

Pro Kabaddi News: यु मुंबाला धुळ चारत बंगाल वॉरियर्सचा शानदार विजय! गुणतालिकेत घेतली आघाडी

U Mumba vs Bengal Warriors: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगाल वॉरियर्स संघाने बलाढ्य यु मुंबा संघाचा 46-34 असा धुव्वा उडवला आहे.

Ankush Dhavre

U Mumba vs Bengal Warriors:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगाल वॉरियर्स संघाने बलाढ्य यु मुंबा संघाचा 46-34 असा धुव्वा उडवला आहे. मनिंदर सिंग(10गुण), नितिन कुमार(8गुण) आणि एस विश्वास (8गुण) यांनी बंगाल वॉरियर्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत दमदार सुरुवात करणाऱ्या वॉरियर्स संघाने पहिल्या पाच मिनिटात सहा गुण मिळवले तेव्हा यु मुंबा संघाने खातेही उघडले नव्हते. जोरदार प्रतिकार करताना त्यांनी दोन गुण मिळवले खरे परंतु वॉरियर्स संघाने प्रतिआक्रमण करताना यु मुंबावर पहिला लोन चढवून 11-2 अशी आघाडी घेतली.

वॉरियर्स संघाने यु मुंबाच्या आमीर मोहम्मद जाफर दानिशला रोखून धरल्यामुळे मध्यंतराला त्यांना सात गुणांची आघाडी घेता आली. उत्तरार्धात ही वॉरियर्सची आगेकूच सूरू झाली असताना शिवमच्या सुपर रेडमुळे यु मुंबा संघाने वॉरियर्सवर पहिला लोन चढवून जोरदार कमबॅक केलं. (Kabaddi news in marathi)

अर्थात वॉरियर्स संघाने त्याची परवा न करता पुन्हा धडाकेबाज आक्रमण केले. मनिंदरने चढाईत सलग गुण मिळवल्यामुळे आठ मिनिटे शिल्लक असताना वॉरियर्स संघाने यु मुंबा संघावर दुसरा लोन चढवून निर्णायक आघाडी घेतली.

अखेरच्या टप्प्यात यु मुंबा संघाला एक-एक गुण मिळवताना कसब पणाला लावावे लागत होते. यु मुंबा संघाने आपले प्रयत्न न सोडता अखेरच्या मिनिटाला वॉरियर्सचे केवळ दोन खेळाडू मैदानात शिल्लक ठेवून बरोबरीच्या आशा निर्माण केल्या. मात्र हर्ष लाड याने सुपर टॅकल करताना वॉरियर्सवर लोन बसण्याची नामुष्की टाळली याच क्षणी यु मुंबाच्या हातून सामना निसटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT