pro kabaddi  saam tv news
क्रीडा

Pro Kabaddi News: युपी योद्धाजला नमवत पुणेरी पलटण संघ अव्वल स्थानी विराजमान

Ankush Dhavre

Pro Kabaddi News:

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने युपी योद्धाज संघाचा 40-38 असा पराभव करून गुण मालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

ताऊ देवीलाल इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत युपी योद्धाजकडून गगन गौडाने चढाईत 16गुण, पुणेरी पलटण संघाकडून पंकज मोहितेने 12 गुण मिळवले.

सामन्यात सुरुवातीला युपी योद्धाज संघाने आक्रमक सुरुवात केली. गगनने सुपर रेड करत मोहंमद रेजा शादलुई, अबिनेश नदराजन वाहिद रेजा यमर यांना बाद करुन संघाला 5-1 अशी तिसऱ्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर गुलविर सिंगने आणखी दोन गुण मिळवून देत पुणेरी पलटण संघावर पहिला लोन चढवून आठव्या मिनिटाला 12-7 अशी आघाडी घेतली. पुणेरी पलटण संघाने सावध सुरुवात करत टॅकलमध्ये दोन गुणांची कमाई केली.

गगनने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत पुन्हा सुपर रेड करत युपी योद्धाज संघाला 24-13 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात युपी योद्धाज संघाने 28-15 अशा 13 गुणांच्या फरकाने वर्चस्व कायम राखले. (Kabaddi news in marathi)

उत्तरार्धात पुणेरी पलटण संघाने जोरदार कमबॅक करत 28व्या मिनिटाला युपी योद्धाज संघावर पहिला लोन चढवून 24-30 अशी आघाडी कमी केली.

पुणेरी संघाच्या मोहंमद रेजा शादलुईने गुलविरची पकड करून संघाला गुण मिळवून दिले. त्यानंतर अस्लम याने उत्कृष्ट कामगिरी करत युपी योद्धाज वर दुसरा लोन चढवून संघाला35-34 अशी स्थिती निर्माण करून दिली.

युपी योद्धाज संघाने तीन मिनिटे शिल्लक असताना गगन याने काही गुण मिळवून दिले. पण पुणेरी पलटण संघाच्या अस्लम आणि मोहमद शादलुईने दोन गुण मिळवून देत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT