Pro Kabaddi (PKL 10) Match Updates: Tamil Thalaivas Beat Up Yoddha by 46-27 Margin Saam tv news
क्रीडा

Pro Kabaddi Season 10: सलग ७ पराभवांनंतर अखेर तमिळ थलायवाजला विजयाचा सुर गवसला! युपी योद्धाजवर मिळवला दणदणीत विजय

Ankush Dhavre

Pro Kabaddi League News In Marathi:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील १० व्या हंगामात बुधवारी (११ जानेवारी) युपी योद्धाज आणि तमिळ थलायवाज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात तमिळ थलायवाजने बाजी मारत युपी योद्धाजवर ४६-२७ असा विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयासह तमिळ थलायवाज संघाने सलग सात पराभवांची मालिका खंडित केली

एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत नरेंदरने चढाईत १४ गुण आणि साहिल गुलियाने पाच पकडी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्यापूर्वी वेगवान जोरदार सुरुवात करत तमिळ थलायवाज संघाने योद्धाजवर ७ व्या मिनिटाला पहिला लोन चढवून ११-२अशी झटपट आघाडी मिळवली. नरेंदर आणि अजिंक्य हे दोघेही उत्कृष्ट चढाया करीत असताना योद्धाज संघाचे परदीप नरवाल व सुरेंदर गिल हे मुख्य आक्रमक अपयशी ठरले. विजय मलिकच्या एकाकी झुंजीनंतरही योद्धाज संघ मध्यांतराला ११-१९ असा पिछाडीवर होता. (Latest kabaddi news In Marathi)

उत्तरार्धात ही याचीच पुनरावृत्ती झाली. नरेंदर च्या दोन सुपर रेड मुळे तमिळ थलायवाज संघाने योद्धाजवर दुसरा लोन चढवताना आघाडीत भर घातली. २६ व्या मिनिटाला तमिळ थलायवाजकडे २९-१५ अशी आघाडी होती.

परदीप नरवाल साठी हा सामना सपशेल अपयशी ठरला. ११ चढायामध्ये त्याच्या सात वेळा पकडी झाल्या. ३०व्या मिनिटाला योद्धाजचे केवळ तीन खेळाडू शिल्लक होते व त्यांचा संघ १५ गुणांनी पिछाडीवर होता.

नितीन पणवरच्या सुपर टॅकल मुळे योद्धाजने अखेरच्या टप्प्यात झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पुरेसा ठरला नाही. नरेंदर च्या आणखी एका सुपर रेड मुळे तमिळ थलायवाजने योद्धाजवर तिसरा लोन चढवीत आठ सामन्यातील पहिल्या विजयाची नोंद केली. योद्धाज साठी हा सलग चौथ्या पराभव होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT