delhi Dabbang vs puneri phaltan Saam tv
Sports

रोमहर्षक अंतिम सामना! वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर दिल्लीचा ‘दबंग’ विजय; पुणेरी पलटनच्या संस्मरणीय हंगामाचा भावनिक शेवट

delhi Dabbang vs puneri phaltan : पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघात अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात दबंग दिल्लीने बाजी मारली.

Vishal Gangurde

प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली यांच्यात सामना झाला.

अटीतटीच्या लढतीत दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा पराभव

दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीग २०२५ चे जेतेपद पटकावलं

दिल्ली : प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेत पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघात रोमहर्षक सामना झाला. अटीतटीच्या सामन्यात दबंग दिल्लीनं ३१- २८ गुणांनी बाजी मारली. हा सामना जिंकून दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धतील जेतेपदाचा मान पटकावलाय.

त्यागराज इनडोअर स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. या सामन्यात दबंग दिल्लीकडून नीरज नरवाल याने सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली. तर अजिंक्य पवारने ६ गुण कमावले आहेत. या सामन्यात पुणेरी पलटनकडून आदित्य शिंदे याने सुपर १० पूर्ण केलंय. पण शेवटच्या मिनिटाला दबंग दिल्लीने बाजी मारली.

या सामन्यात अस्लम इनामदार पहिली चढाई करण्यासाठी आला होता. त्याने पहिल्याच चढाईत बोनस घेऊन संघाला चांगल सुरुवात करून दिली. या सामन्यात आशू मलिकची पहिल्याच चढाईत पकड झाली होती. पंचांने त्याला सेफ घोषित केलं. यासह दबंग दिल्लीनेही खातं उघडलं.

डू ओर डाय रेडमध्ये पंकज मोहिते याने १ गुण घेतला. सुरुवातीची ५ मिनिटांत दबंग दिल्लीचा संघ ६-४ गुणांसह २ गुणांनी आघाडीवर होता. पूर्वार्धातील सुरुवातीच्या १० मिनिटांचा खेळ झाला. त्यावेळी दबंग दिल्लीचा संघ ८-६ गुणांसह २ गुणांनी आघाडीवर होता.

पूर्वार्धातील पुढील १० मिनिटांमध्ये दोन्ही संघांमध्ये रोमहर्षक सामना रंगला. १३ व्या मिनिटाला पुणेरी पलटन संघाने तिसऱ्यांदा सुपर टॅकल केलं. त्यामुळे संघाच्या गुणसंख्येत आणखी २ गुणांची भर घातली. पुणेरी पलटनचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झालाय. दबंग दिल्ली संघाने आणखी ४ गुणांची भर घातली. दिल्ली संघाने १४- ८ गुणांसह ६ गुणांनी आघाडी घेतली.

या सामन्याच्या पूर्वार्धातील २० मिनिटांचा खेळ झाला. त्यावेळी दबंग दिल्लीचा संघ २०-१४ गुणांसह ६ गुणांनी आघाडीवर होता. दिल्लीच्या संघाने आघाडी कायम ठेवली. उत्तरार्धातील १० मिनिटांचा खेळ पूर्ण झाला. त्यानंतर दबंग दिल्लीचा संघ २४-१८ गुणांसह ६ गुणांनी आघाडीवर होता.

शेवटचे ५ मिनिटे शिल्लक राहिले. त्यावेळी दबंग दिल्लीचा संघ २७-२० गुणांसह ७ गुणांनी आघाडीवर होता. शेवटच्या ३ मिनिटांत दबंग दिल्लीचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. शेवटचा १ मिनिटांत शिंदेने २ गुण घेत गुणसंख्या २९-२७ वर पोहोचवली. शेवटच्या टप्प्यात दबंग दिल्ली संघाने सामना ३१-२८ गुणांच्या फरकाने जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakri Making Tips: भाकरी थापताना तुटते, फुगतच नाही? वापरा १ सोपी ट्रिक, भाकऱ्या होतील गोल अन् मऊ

'माझ्यासकट माझ्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न', उद्धव ठाकरेंना संशय

Maharashtra Live News Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दाखवला पुराव्याचा ढिगारा; विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Hair Oil : केस मुळापासून होतील स्ट्राँग, नियमित करा या तेलाचा वापर

SCROLL FOR NEXT