madhya pradesh News
madhya pradesh Politics Saam tv

Politics : हायव्होल्टेज ड्रामा! भडकलेल्या भाजप खासदाराने चालकाच्या कानाखाली मारली, नेमकं काय घडलं? VIDEO

madhya pradesh Politics : भडकलेल्या भाजप खासदाराने चालकाला गालावर थापड मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on
Summary

भाजप खासदार गणेश सिंह यांनी क्रेन ऑपरेटरवर थेट कानशिलात लगावली

हायड्रोलिक मशीन अर्ध्यात थांबली, त्यामुळे खासदार संतप्त झाले.

उपस्थित युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी घटना कॅमेरात कैद झाली.

या घटनेने सार्वजनिक कार्यक्रमातील सुरक्षा, यंत्रणा नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर

मध्य प्रदेशच्या सतनामध्ये सरदार पटेल जयंतीनिमित्त आयोजित 'रन फॉर यूनिटी' कार्यक्रमादरम्यान मोठा राडा झाला. महापुरुषांच्या प्रतिमेस हार अर्पण करताना हायड्रोलिक मशीनमध्ये बसलेल्या भाजप खासदार गणेश सिंह यांना झटका बसला. त्यानंतर भडकलेल्या भाजप खासदार गणेश सिंह यांनी क्रेन ऑपरेटरला थेट कानाखाली लगावली. सेमरिया चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रन फॉर यूनिटी कार्यक्रमानंतर भाजप खासदार गणेश सिंह दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांना हायड्रोलिक क्रेनचा आधार घ्यावा लागला.

madhya pradesh News
Mumbai Hostage Crisis: पवईतील ओलिस 17 लहान मुलांना कसं सोडवलं? पोलिसांनी सांगितला घटनेचा थरार

प्रतिमेला हार अर्पण करताना मशीन अचानक मध्येच थांबली. त्यामुळे काही वेळ खासदार हवेतच अडकले. त्यामुळे त्यांना राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी खासदारांनी थेट क्रेन ऑपरेटरच्या कानशि‍लात लगावली.

madhya pradesh News
Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

कर्मचाऱ्याचं नाव देखील गणेश आहे. घटनेच्या वेळी भाजप कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. अचानक घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी उपस्थित लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर भाजप खासदार यांचा कानाखाली लगावतानाचा व्हिडिओ सोशल मीडिायावर व्हायरल होत आहे.

Q

 प्रकरण कुठे घडले?

A

मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यात झालेल्या ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे.

Q

भाजप खासदारांनी काय केलं?

A

 भाजप खासदार गणेश सिंह यांनी क्रेन ऑपरेटरला थेट कानाखाली मारल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com