Kalyan Dombivli : गोळीबाराचा वाद विरला? भाजप आमदार आणि महेश गायकवाड एकत्र, कल्याणसाठी शिंदे-भाजपचा फॉर्म्युला ठरला?

Kalyan Dombivli News : भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि महेश गायकवाड यांनी विभागात एकत्र पाहणी दौरा केला. यामुळे गोळीबाराचा वाद विरला का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Kalyan Dombivli
Kalyan Dombivli News : Saam tv
Published On
Summary

कल्याणमध्ये भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड एकत्र

गोळीबाराच्या वादानंतर प्रथमच दोघे एकत्र

यु-टाईप रस्ता प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान दोघे एकत्र

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. कट्टर विरोधक असलेले भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आज पहिल्यांदाच एकत्र दिसले. कल्याण कोळशेवाडी परिसरातील यु-टाईप रस्ता प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात हे दोन्ही नेते एकत्र दिसले आणि हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं.

दोघांमध्ये काही वर्षांपूर्वी गोळीबार प्रकरणामुळे तीव्र वाद निर्माण झाला होता. आमदार सुलभा गायकवाड यांचे पती माजी आ. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर कल्याण पूर्वेचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर सुलभा गायकवाड यांनी भाजपकडून निवडणूक लढवली, तर महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करत अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी पक्षशिस्तभंगाबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून महेश गायकवाड यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकलपट्टी देखील करण्यात आली होती.

Kalyan Dombivli
kelsi Grammer : प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ७० व्या वर्षी बनला बाप; बायकोसोबत केलं ८ व्या मुलाचं स्वागत

दोघे विकासाच्या कामासाठी एकत्र आले, असं स्पष्ट करत त्यांनी तणाव संपल्याचे संकेत दिले की काय? तर या दोन कट्टर राजकीय विरोधकांच्या एकत्र येण्याने कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Kalyan Dombivli
Pune Politics : पुण्याच्या राजकारणात उलथापालथ; भाजपच्या अनुप मोरे यांचा अखेर राजीनामा

विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील कल्याण पूर्व येथील वाद विकासाच्या निमित्ताने थांबला आहे का? आणि पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीत लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मात्र ​या संदर्भात कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी कल्याणमध्ये महायुतीच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यास स्वबळावर लढण्यासाठीही आम्ही तयार आहोत असे सांगून राजकीय सस्पेन्स कायम ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com