pro kabaddi 2023, Gujarat Giants vs U Mumba X/Pro Kabaddi
क्रीडा

PKL 2023 : गुजरातची विजयाची हॅट्ट्रिक! क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यात यू मुम्बावर मिळवला निसटता विजय

Ankush Dhavre

Pro Kabaddi 2023:

प्रो कबड्डी लीग २०२३ स्पर्धेतील सातव्या सामन्यात यू मुम्बा आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. गुजरात जायंट्स संघाने यू मुम्बावर ३९-३७ ने विजय मिळवला आहे.

गुजरात जायंट्सकडून राकेशने दमदार खेळ करत ९ गुणांची कमाई केली. तर रोहित गुलियाने ७ गुणांची कमाई केली. यू मुम्बाकडून फजल अत्राचली चमकला, त्याने आपलं हाय फाय पूर्ण केलं. या सामन्यात यू मुंबाच्या चढाईपटूंनी दमदार खेळ केला मात्र बचावपटूंना हवी तशी कामगिरी करता आली नाही.

या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यू मुम्बाने ६ गुणांची आघाडी घेतली. त्यांनतर सोनूने शानदार खेळ केला आणि आपल्या संघाला २३-१९ ची आघाडी मिळवून दिली. ३० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर गुजरातचा संघ ३०-२२ ने आघाडीवर होता. इथून यू मुम्बाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण कमबॅक करू शकला नाही. (Latest sports updates)

गुजरात जायंट्सने या सामन्यात चढाई करताना २६ गुणांची कमाई केली. यू मुम्बाने २७ गुणांची कमाई केली. पकड करण्यात यू मुंबाचा संघ पकड करण्यात मागे पडला. गुजरात जायंट्सने ९ गुणांची कमाई केली. यू मुम्बाने ६ गुणांची कमाई केली.

गुजरातचा संघ गुणतालिकेत ३ पैकी ३ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर यू मुम्बाने २ पैकी १ सामना जिंकला आहे. दबंग दिल्लीचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT