playoffs qualification scenario for mumbai indians in ipl 2024 amd2000 twitter
Sports

MI Playoffs Scenario: मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! कसं असेल समीकरण?

Playoffs Scenario For Mumbai Indians: मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेतील केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. मात्र अजूनही मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. दरम्यान कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाने ९ सामने खेळले असून केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर उर्वरीत ६ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ ६ गुणांसह नवव्या स्थानी आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना मुंबई इंडियन्स संघाला १० धावांनी गमवावा लागला आहे. या सुमार कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये जाणार का? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

कसं असेल समीकरण?

मुंबई इंडियन्सचा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. इथून पुढे मुंबईचे ५ सामने शिल्लक आहेत. मुंबईला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर मुंबईला हे सर्वा सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र हे सर्व सामने जिंकूनही मुंबईला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. इथून पुढे मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध प्रत्येकी २-२ सामने खेळणार आहे. तर १ सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. मुंबईला जर प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर हे सर्व सामने जिंकणं गरजेंच असणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आधी राजस्थान रॉयल्स संघाने ९ गडी राखून धुव्वा उडवला. तर आता दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १० धावांनी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना पुढील सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणार आहे.

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपरजायंट्सचा संघ देखील तुफान फॉर्ममध्ये आहे. या संघाने ९ पैकी ५ सामने जिंकले असून १० गुणांसह हा संघ चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. गेल्या वेळी जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते, त्यावेळी सनरायझर्स हैदराबादने २० षटकात २७७ धावांचा डोंगर उभारला होता.

त्यामुळे यावेळी मुंबईचा संघ जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मुंबईसमोर २ कठीण आव्हान आहेत, मात्र प्लेऑफमध्ये जायचं असेल तर, मुंबईला हे दोन्ही सामने जिंकून पुढील सामने जिंकणंही अतिशय महत्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT