Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, स्वयंपाकघरातील काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही वजन कमी करू शकता
कढीपत्त्याचे पाणी हे केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
कढीपत्त्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढते यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात.
कढीपत्त्यातील पोषक तत्वे रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करण्यास मदत करतात.
कढीपत्त्याचं पाणी बनण्यासाठी ताजे कढीपत्त्याची पाने आणि पाणी हे साहित्य घ्या.
.
गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळू लागल्यावर त्यात स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पाने टाका.
पाणी अर्धे होईपर्यंत किंवा पाण्याचा रंग बदलेपर्यंत कढीपत्ता पाणी उकळा. नंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.
कढीपत्त्याचं तयार पाणी हे कोमट असताना सकाळी रिकाम्या पोटी प्या यामुळे फायदा होतो.