ind vs pak
ind vs pak  saam tv news
क्रीडा | T20 WC

IND vs PAK Series: भारत- पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेसाठी दोन्ही क्रिकेट बोर्ड तयार!समोर आली मोठी अपडेट

Ankush Dhavre

PCB Chief On IND vs PAK Series:

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. मात्र हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. क्रिकेट चाहत्यांना नेहमी वाटतं की या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमने सामने यावं. या मालिकेसाठी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार असल्याची माहीती समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये २०१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली. त्यानंतर ११ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशाचे संबंध बिघडले. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली.

केवळ क्रीडा नव्हे तर कला आणि अभिनय क्षेत्रातील लोकांना देखील भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली. काही वर्षांनंतर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळेच पाकिस्तानला भारत दौऱ्यावर येण्याची अनुमती दिली गेली.मात्र त्यानंतर पुन्हा अंतर्गत वादांमुळे पाकिस्तानातील खेळाडूंना भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली. (Latest sports updates)

काय म्हणाले PCB चीफ?

पीसीबीचे चीफ अशरफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की,'दोन्ही देशातील क्रिकेट बोर्ड आपसापसात क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहेत. आम्ही सरकारच्या अनुमतीची वाट पाहतोय.' अशरफ यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर बीसीसीआयने कुठलंही प्रत्युत्तर दिलेलं नाही. काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी स्पष्ट केलं होतं की, जोपर्यंत पाकिस्तान सीमेवरील हल्ले आणि घुसखोरी करणं थांबवत नाही. तोपर्यंत भारत द्विपक्षीय मालिकेसाठी होकार देणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhushi Dam Video : भुशी डॅममध्ये ५ जण वाहून गेले; काळजात धडकी भरवणाऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

Today Marathi News : भाविकांसाठी महत्वाची बातमी; विठुरायाच्या दर्शन रांगेत बदल

Video : निवृत्तीनंतर पेन्शन मिळाली पाहिजे, अधिवेशनात अजित पवार नेमकं काय म्हणाले?

VIDEO: पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात आहे, Devendra Fadnavis यांचा मोठा आरोप

Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट

SCROLL FOR NEXT