pbks vs rr pitch report and weather update cricket news in marathi  twitter
क्रीडा

PBKS vs RR: पंजाब - राजस्थान सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

PBKS vs RR, Weather Update: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६५ व्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६५ व्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापरा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. लखनऊच्या पराभवानंतर राजस्थानने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पंजाबचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे.

राजस्थानचा संघ पुढील दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ या सामन्यात जोर लावताना दिसून येऊ शकतो. दरम्यान जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि काय सांगतो हवामानाचा अंदाज?

कशी असेल खेळपट्टी?

हा सामना गुवाहाटीत रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाज आणि गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. नोव्हेंबर २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४४७ धावा केल्या होत्या. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते.

कसं असेल हवामान?

या सामन्यावेळी ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळच्या वेळी तापमानाचा पारा ३२ डिग्रीच्या आसपास असेल. पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना क्रिकेट अॅक्शन पाहायला मिळेल.

असे आहेत दोन्ही संघ:

पंजाब किंग्ज: जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग, रिले रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा, सॅम करन (कर्णधार), आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चाहर, अर्शदीप सिंग, विधाथ कावेरप्पा, हरप्रीत बराड़, नाथन एलिस, ख्रिस वोक्स, ऋषी धवन, हरप्रीत सिंग भाटिया, तनय त्यागराजन, शिखर धवन, अथर्व तायडे, शिवम सिंग, प्रिंस चौधरी, विश्वनाथ सिंग.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जायसवाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल, रोवमन पॉवेल, नांद्रे बर्गर, केशव महाराज, तनुश कोटियन, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, कुणाल सिंग राठौड़, नवदीप सैनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT