Australia Open : सबालेंकानं मिळवला रोमहर्षक विजय; जिंकलं महिला ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद

Australia Open 2024 : सबोलेंकाने चीनच्या कियानवेन झेंगला पराभूत केलं. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू साबलेंकाने ६-३, ६-२ असा विजय मिळवून कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
Australia Open 2024  Sabalenka
Australia Open 2024 Sabalenka X

Sabalenka wins Australia Open 2024 Title:

ऑस्ट्रेलिया ओपन महिला टेनिसच्या सामन्यात अखेरपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. रोमांचकारी सामन्यात बेलारूसची स्टार आर्यना सबालेंकानं महिलांच्या अंतिम फेरीत शानदार विजय मिळवलाय. सबोलेंकाने चीनच्या कियानवेन झेंगला पराभूत केलं. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू साबलेंकाने ६-३, ६-२ असा विजय मिळवून कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. (Latest News)

२५ वर्षीय सबालेंकाने मागील दोन आठवड्यापासून मेलबर्न पार्कमध्ये आपला दमदार खेळ दाखवला. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी तिला जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानी असलेल्या कोको गौफ आणि बारबोरा क्रेजिसिकोवाशी लढत करावी लागली. संपूर्ण स्पर्धेत सबालेंकाने एकही एकही सेट गमावला नाही. दुसरीकडे झेंगनेने पहिली ग्रँड स्लॅम फायनल खेळली. चीनी स्टारने गेल्या वर्षी यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तेथे तिला सबालेंकाने पराभूत केलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सबालेंकाने २०१३ मध्ये व्हिक्टोरिया अझारेंकाने ली नाला पराभूत केलं होतं. साबलेंकाने ही महिला एकेरीत पहिलं मोठे विजेतेपद जिंकणारी ही पहिली खेळाडू ठरलीय. झेंगचे आव्हान मोडून काढण्यासाठी सबालेंकाला ७६ मिनिटे झुंज द्यावी लागली. दरम्यान झेंग डब्ल्यूटीए एकेरी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये प्रवेश करेल तर सबालेंका इगा स्विटेकनंतर दुसऱ्या स्थानावर असेल.

Australia Open 2024  Sabalenka
Australian Open 2024: ग्रँड सलाम ! ४३ वर्षीय बोपण्णानं मारलं Australian Openचं मैदान; जिंकला ग्रँड स्लॅम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com