T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

Nepal Script History at Wankhede : नेपाळने ८ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या विजयाने टी-२० विश्वचषकाची सुरुवात केली. आता त्याच मैदानावर त्यांचा सामना जिंकून शेवट केला गोड. १२ वर्षांनंतर त्यांनी पहिला टी-२० विश्वचषकातील सामना जिंकला.
Nepal Script History at Wankhede :
Nepal defeats Scotland at Wankhede Stadium in T20 World Cup 2026, securing their first tournament winsaam tv
Published On
Summary
  • नेपाळचा 12 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कपमधील पहिला विजय

  • स्कॉटलंडवर वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक मात

  • स्पर्धेचा शेवट विजयाने करत नेपाळने लिहिला इतिहास

नेपाळने ८ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या विजय मिळवत टी२० विश्वचषकाची सुरुवात केली होती. आता त्याच मैदानावर नेपाळने स्पर्धेचा शेवट गोड केला. १७ फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर स्कॉटलंडला हरवून नेपाळने १२ वर्षांनंतर टी२० विश्वचषकातील सामना जिंकला. नेपाळने ७ विकेटने रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात दीपेंद्रला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

नेपाळने २०१४ मध्ये पहिल्यांदा टी२० विश्वचषकात भाग घेतला होता, त्यात त्यांनी हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर २०२४ पर्यंत त्यांना एकही सामना जिंकता आलेला नव्हता. आता थेट १२ वर्षांनंतर त्यांनी स्पर्धेतील विजयाचा दुष्काळ संपवला. नेपाळकडून दीपेंद्र सिंग ऐरीने फलंदाजीत आणि सोमपाल कामीने आपल्या गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. दीपेंद्रने शानदार फलंदाजी केली, नाबाद राहत २३ चेंडूत त्याने ५० धावा केल्या आणि सामना जिंकवला. तर कामीने गोलंदाजीत शानदार खेळी करत ३ विकेट घेतल्या.

मायकेल जोन्सची शानदार फलंदाजी

नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचा आमंत्रण मिळाल्यानंतरही स्कॉटलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण संघाच्या सलामीवीर जोडीनं १० षटकात धावफलकावर ८० धावा लावल्या होत्या. रोहितने सलामीवीर जॉर्ड मुन्सीला बाद करत ८० धावांची सलामी भागीदारी मोडली. जॉर्डने २७ धावा केल्या होत्या.

तर मायकेल जोन्सने ४५ चेंडूत ७१ धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि तीन षटकार मारले. ब्रेंडन मॅकमुलेनने २५ आणि कर्णधार रिची बेरिंग्टनने १० धावा केल्या. मार्क वॅट चार चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला. १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळने दमदार सुरुवात केली. त्यांनी ९.१ षटकांत ७४ धावा केल्या. कुशल भुर्तेलने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याचा सहकारी सलामीवीर आसिफ शेखने २७ चेंडूत ३३ धावा केल्या. कर्णधार रोहित १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर दीपेंद्र सिंग ऐरी आणि गुलशन झा यांनी सामना तडीस नेत विजय मिळवला. या दोघांनी ३६ चेंडूत नाबाद ७३ धावांची भागीदारी केली. दीपेंद्रने ५० धावा केल्या, तर गुलशनने १७ चेंडूत नाबाद राहत २४ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com