PBKS vs RR Highlights x
Sports

PBKS vs RR Highlights : यशस्वीची वादळी खेळी, संजू-परागनं मैदान गाजवलं अन् पंजाबला तगडं आव्हान दिलं

PBKS vs RR Match Updates : पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यामध्ये पंजाबने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी केली. फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने २० ओव्हर्समध्ये २०५ धावा केल्या.

Yash Shirke

PBKS vs RR : पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स ही आयपीएल २०२५ मधली लढत सुरु आहे. या सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना आज पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने एकूण २०५ धावा केल्या. पंजाबसमोर २०६ धावांचे आव्हान आहे.

यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी सुरुवातीपासून पंजाबवर हल्ला चढवला. पावर प्ले संपेपर्यंत यशस्वी आणि संजू यांनी कडक फलंदाजी केली. संजूने ३८ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल टिकून खेळला, ६७ धावा करुन तो माघारी परतला. त्यानंतर आलेला नितीश राणा १२ धावांवर बाद झाला. रियान पराग शेवटपर्यंत टिकून राहिला, त्याने नाबाद ४३ धावा केल्या.

सामन्याच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स पंजाबवर भारी पडत होती. पण संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर मध्यल्या वेळेत पंजाबने कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर रियान परागने आक्रमक खेळ केला. शिमरॉन हेटमायर आणि नितीश राणा यांनीही धावा करण्याचा प्रयत्न केला. पंजाबने राजस्थानचे एकूण ४ गडी बाद केले.

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक, संदीप शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT