CSK VS DC Highlights : थाला नही चला... शेवटपर्यंत धोनी मैदानात असतानाही चेन्नईचा पराभव, दिल्लीचा सलग तिसरा विजय

CSK VS DC Match Highlights : चेपॉकच्या घरच्या स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा पराभव झाला आहे. दिल्लीने चेन्नईवर २५ धावांनी विजय मिळवला आहे. हा चेन्नईचा आयपीएल २०२५ मधला सलग तिसरा पराभव आहे.
CSK VS DC Highlights MS Dhoni
CSK VS DC Highlights MS Dhonix
Published On

CSK VS DC IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला चेपॉक स्टेडियममध्ये पराभूत केले आहे. फलंदाजी करताना चेन्नईचा संघ सपशेल फसला. सलामीपासून ते मध्यम फळीपर्यंत प्रमुख फलंदाज लवकर बाद झाला. त्यानंतर कमबॅक न करता आल्याने चेन्नईने सामना गमावला. चेन्नईने २० ओव्हर्समध्ये १५८ धावा केल्या. यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२५ मध्ये सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला गेला. दिल्ली संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. दिल्ली कॅपिटल्सच्या शिलेदारांनी २० ओव्हर्समध्ये १८३ धावा केल्या आणि चेन्नईला १८४ धावा करण्याचे आव्हान दिले. पण सामन्यामध्ये सीएसकेचा २५ धावांनी पराभव झाला.

CSK VS DC Highlights MS Dhoni
Digvesh Rathi : मानधन ३० लाख अन् दंड बसला ५ लाख! दिग्वेश राठीला नोटबुक सेलिब्रेशन भोवलं

दिल्लीचा सलामीवीर जॅक फ्रेझर मॅकगर्क शून्यावर माघारी परतला. दुसऱ्या बाजूने केएल राहुलने डाव सावरण्याची जबाबदारी घेतली. शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून राहुलने ७७ धावा केल्या. त्याला अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्सची काही प्रमाणात साथ मिळाली.

CSK VS DC Highlights MS Dhoni
Dhoni-Jadeja : जडेजाचा थ्रो आणि धोनीची स्टंपिग, चेपॉकच्या मैदानात दिसली जबरदस्त केमिस्ट्री, Video व्हायरल

दुसऱ्या बाजूला चेन्नईची फलंदाजी सुरुवातीलाच कोसळल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही सलामीवीरांसह कर्णधार गायकवाड लवकर बाद झाले. रवींद्र जडेजा, शिवम दुबे देखील मोठी धावसंख्या करण्यात अयशस्वी ठरले. विजय शंकर आणि एमएस धोनी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विजय शंकरने नाबाद ६९ धावा केल्या, तर धोनीने ३० धावा केल्या.

CSK VS DC Highlights MS Dhoni
MS Dhoni : चेन्नईत मॅच, स्टेडियममध्ये आई-वडील, अन् जडेजाची ती स्टोरी... धोनी रिटायरमेंट घोषित करणार? जोरदार चर्चा

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, आर. अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अक्षर पटेल (कर्णधार), जॅक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.

CSK VS DC Highlights MS Dhoni
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालच्या गोव्याकडून खेळण्याच्या निर्णयावर आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य, 'त्याने पैशांसाठी...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com