pathun nissanka twitter
क्रीडा

Pathum Nissanka Double Century: पथुम निसंकाने रचला इतिहास! वनडेत डबल सेंच्युरी मारणारा ठरला श्रीलंकेचा पहिलाच फलंदाज

Pathum Nissanka Double Century News: श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसंकाने अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या वनडे सामन्यात इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

Pathum Nissanka Double Century:

श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसंकाने (Pathum Nissanka) अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या वनडे सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने १३९ चेंडूंचा सामना करत २० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद २१० धावांची खेळी केली आहे. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी दुहेरी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

श्रीलंका आणि अफगाणिस्तान (India vs Afghanstan) या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पलेकल्लेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात पथुम निसंकाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पथुम निसंकाने शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

दुहेरी शतक पूर्ण करण्यापूर्वी त्याने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील चौथे शतक ठरले.

तर या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटक अखेर श्रीलंकेने ३ गडी बाद ३८१ धावा केल्या आहेत. पथुम निसंकाने दुहेरी शतक झळकावलं तर अविष्का फर्नांडोने ८८ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान ८ चौकार आणि ३ षटकार मारले. (Cricket news in marathi)

या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या पथुम निसंकाने संघाला चांगली सुरुवात करून दिली. अविष्का फर्नांडो आणि पथुम निसंकाने मिळून संघासाठी १८२ धावा जोडल्या. तर कुसल मेंडिस आणि पथुम निसंकाने ४३ धावा जोडल्या. त्यानंतर पथुम निसंकाने समरविक्रमासोबत मिळून १२० धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT