SL vs ZIM : N6, 4, 6, 0, 1, 6... झिम्बॉब्वेचा श्रीलंकेवर थरारक विजय, अखेरच्या षटकात चिंधड्या उडवल्या

Sri lanka vs Zimbabwe T20 match : झिम्बॉब्वेच्या ल्यूक जोंग्वे आणि क्लाइव्ह मदांडे यांनी अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करत श्रीलंकेवर ४ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला.
Sri lanka vs Zimbabwe T20 match
Sri lanka vs Zimbabwe T20 matchSAAM TV

Sri lanka vs Zimbabwe :

झिम्बॉब्वेच्या ल्यूक जोंग्वे आणि क्लाइव्ह मदांडे यांनी अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करत श्रीलंकेवर ४ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. झिम्बाब्वेला अखेरच्या षटकात २४ धावांची गरज होती. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला झिम्बाब्वेच्या या जोडीनं लक्ष्य केलं आणि विजयाला गवसणी घातली.

श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात झिम्बाब्वेच्या चिवट फलंदाजांनी श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय मिळवला.  (Latest sports updates)

श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात १७३ धावा केल्या होत्या. हे तगडं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं १९.५ षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात ते पार केलं. त्यांनी १७८ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करणारा ल्यूक जोंग्वे हा सामन्याचा मानकरी ठरला.

श्रीलंकेनं (Sri Lanka) प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा केल्या. श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाची एक धाव असताना पाथुम निसंका हा बाद झाला. त्यानंतर कुसल परेरा बाद झाला. तर २० धावा असताना कुसल मेंडिस हा मोठा धक्का श्रीलंकेला बसला. त्यानंतर सदीरा समारविक्रमा बाद झाला.

श्रीलंकेची आघाडीची फलंदाजी ढेपाळली असताना चरिथ असलंका आणि अँजेलो मॅथ्यूज या जोडीनं संघाचा डाव सावरला. दोघांनी मोठी भागीदारी रचली. असलंकाने अवघ्या ३९ चेंडूंत ६९ धावांची तुफानी खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ५ चौकार तडकावले. तर मॅथ्यूजने ५१ चेंडूंत दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. या जोरावर श्रीलंकेने १७३ धावा केल्या. (Cricket News Update)

Sri lanka vs Zimbabwe T20 match
Ranji Trophy: मुंबईकर शम्स मुलानीने घेतल्या १० विकेट्स! बोनस पॉईंटसह मुंबईचा सलग दुसरा विजय

झिम्बाब्वेची चिवट खेळी

२० षटकांत १७४ धावांचं लक्ष्य पार करण्याच्या इराद्यानं झिम्बाब्वे संघ मैदानात उतरला. पण २२ धावा असताना तिनाशेच्या रुपानं पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर क्रेग एर्विननं डाव सावरला. त्यानं ७० धावांची खेळी केली. तर त्याला ब्रायन जॉन बेनेटची साथ मिळाली. त्यानं २५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर डाव घसरला. मात्र, जोंग्वे आणि क्लाइव मदांडे या जोडीनं रोमहर्षक विजय मिळवून दिला. जोंग्वेने १२ चेंडूत २५ धावा आणि मदांडेने अवघ्या ५ चेंडूंत १५ धावा कुटल्या.

Sri lanka vs Zimbabwe T20 match
Team India News: यशस्वी जयस्वाल अन् शिवम दुबेची लॉटरी लागली! BCCI देणार मोठं गिफ्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com