Team India News: यशस्वी जयस्वाल अन् शिवम दुबेची लॉटरी लागली! BCCI देणार मोठं गिफ्ट

Yashasvi Jaiswal- Shivam Dube: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने २-० ची आघाडी घेतली आहे
Shivam dube with yashasvi jaiswal
Shivam dube with yashasvi jaiswalsaam tv news
Published On

Gift From BCCI To Shivam Dube And Yashasvi Jaiswal:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने २-० ची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा टी-२० सामना येत्या १७ जानेवारी रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे.

या मालिकेत युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. दरम्यान या मालिकेत दमदार कामगिरी केल्याचं फळ म्हणून बीसीसीआय दोघांनाही मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.

बीसीसीआय देणार गिफ्ट..

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा केंद्रीय करारात समावेश केला जाऊ शकतो. माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जातोय की,दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळ केला आहे. त्याचं फळ म्हणून त्यांचा समावेश केला जाणार आहे.

Shivam dube with yashasvi jaiswal
Rohit Sharma Record: एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

बीसीसीआयच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनूसार, 'निवडकर्ते आणि टीम मॅनेजमेंटचं असं म्हणणं आहे की, शिवम दुबेने जास्तीत जास्त गोलंदाजी करावी. कारण यामुळे एक खेळाडू म्हणून त्याचं महत्व आणखी वाढेल. हेच कारण आहे की तो या मालिकेदरम्यान चांगली गोलंदाजी करतोय. जर त्याने आणखी चांगली गोलंदाजी केली तर तो वेस्टइंडिज आणि युएसमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवू शकतो. हार्दीक पंड्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट म्हणून शिवम दुबे हा मुख्या पर्याय ठरु शकतो.' (Latest sports updates)

Shivam dube with yashasvi jaiswal
IND vs AFG 3rd T20I: भारत- अफगाणिस्तान अंतिम सामना रद्द होणार? वाचा काय आहे कारण?

भारत- अफगाणिस्तान मालिकेत दमदार कामगिरी..

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान सुरु असलेल्या मालिकेत दोन्ही फलंदाज दमदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना शिवम दुबेने नाबाद ६० धावांची खेळी करत संघाला सामना जिंकून दिला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ६८ तर शिवम दुबेने ६३ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com