pat cummins spotted playing cricket with school kids in hyderabad video viral amd2000 twitter
Sports

Pat Cummins Viral Video: पॅट कमिन्सने घेतला शाळकरी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद;Video व्हायरल

Pat Cummins Playing Cricket With School Kids:सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफचं चित्र आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. (Pat Cummins Playing Cricket With School Kids)

दरम्यान गुरुवारी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार होते. हा सामनाही पावसामुळे रद्द झाला आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्स मैदानावर आपल्या भेदक गोलंदाजीसाठी आणि रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. याउलट मैदानाबाहेर त्याने अनेकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात तो शाळकरी मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार हैदराबादमधील शाळकरी मुलांसोबत क्रिकेटचा आनंद घेताना दिसून येत आहे. या व्हिडिओत पॅट कमिन्स फलंदाजी करताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

हैदराबादची आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरी

सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाने ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT