पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेतील चौथ्या दिवशी भारतीय फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या मनू भाकरने आणखी पदक पटकावलं आहे. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल टीम इव्हेंटमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे. यासह हॉकीमधून भारतीय फॅन्ससाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. भारताने आयर्लंडवर २-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान पाचव्या दिवशी कोणते खेळाडू अॅक्शनमध्ये असणार? जाणून घ्या.
ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्निल कुसळे यांना ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स इव्हेंटच्या फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.
पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि प्रणॉयसाठी अतिशय महत्वाचा सामना असणार आहे.
अनुष अग्रवाल ड्रेसाज इंडिव्हिज्युअल ग्रँड प्रिक्स इव्हेंटच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
मानिका बात्राला टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची संधी असणार आहे.
12.30 PM
शूटिंग - पुरुषांची 50m रायफल 3 पोझिशन्स (क्वालिफिकेशन)
ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसाळे
12.30 PM
शूटिंग - महिला ट्रॅप (क्वालिफिकेशन - दुसरा दिवस)
राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग
12.50 PM पासून
बॅडमिंटन - महिला सिंगल्स (ग्रुप स्टेज)
पी. व्ही. सिंधू
1.24 PM
रोइंग - पुरुषांची सिंगल्स स्कल्स (सेमी फायनल C/D)
बलराज पनवार
1.30 PM
इक्वेस्ट्रियन - ड्रेसाज इंडिव्हिज्युअल ग्रँड प्रिक्स (दुसरा दिवस)
अनुष अग्रवाल
1.40 PM पासून
लक्ष्य सेन
बॅडमिंटन - पुरुषांची सिंगल्स (ग्रुप स्टेज)
2.30 PM
टेबल टेनिस - महिला सिंगल्स (राऊंड ऑफ 32)
स्रीजा अकुला
3.50 PM
बॉक्सिंग - महिला 75kg (राऊंड ऑफ 16)
लोवलिना बोरगोहेन
3.56 PM
आर्चरी - महिला इंडिव्हिज्युअल (राऊंड ऑफ 64)
दीपिका कुमारी
4.35 PM
आर्चरी - महिला इंडिव्हिज्युअल (राऊंड ऑफ 32)
*योग्य पात्रतेनुसार
7.00 PM
शूटिंग - महिला ट्रॅप (फायनल)
*योग्य पात्रतेनुसार
8.30 PM
टेबल टेनिस - महिला सिंगल्स (राऊंड ऑफ 16)
मनिका बत्रा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.