LAKSHYA SEN TWITTER
Sports

Paris Olympics 2024: सेन 'लक्ष्य' गाठणार का? कांस्यपदकासाठी होणार सामना; पाहा पॅरिसमधील आजचं शेड्यूल

Paris Olympics 2024 India Schedule 5th August: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील १० व्या दिवशी भारताची नजर कांस्यपदकावर असणार आहे. लक्ष्य सेनचा बॅटमिंटन पुरुष एकेरीत कांस्यपदकासाठी सामना होणार आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज १० व्या दिवशी भारताची नजर कांस्यपदकावर असणार आहे. भारताने आतापर्यंत तीन कांस्यपदक जिंकले आहेत. तिन्ही कांस्यपदक नेमबाजीतून मिळाले आहेत. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे सेनवर असणार आहे. सर्व भारतीयांना सेनला कांस्यपदक मिळावं, अशी आशा आहे.

लक्ष्य सेनचा आज कांस्यपदकासाठी मलेशियासोबत सामना होणार आहे. लक्ष्यने हा सामना जिंकल्यास कांस्यपदकाचा मानकरी ठरणार आहे. तसेच आज स्कीट मिक्स टीमचाही सामना होणार आहे. तसेच भारतीय खेळाडूंची कुस्तीच्या सामन्यांमध्ये एन्ट्री होणार आहे. तर टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा अॅक्शनमध्ये असणार आहे.

आज कसं आहे शेड्यूल?

नेमबाजी : महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका , दुपारी १२.३० वाजता

टेबल टेनिस : महिला टीम (प्री क्वार्टर फायनल) : भारत विरुद्ध रोमानिया, दुपारी १.३० वाजता

नौकायन : महिला डिंगी (ओपनिंग सीरीज ) शर्यत ९- दुपारी ३.४५ वाजता

एथलॅटिक्स : महिला ४०० मीटर : किरण पहल (हीट पाच) - दुपारी ३.५७ वाजता

नौकायन : महिला डिंगी (ओपनिंग सीरीज) शर्यत १० - सायंकाळी ४.५३ वाजता

बॅडमिंटन : पुरुष एकेरी (कांस्यपदक प्लेऑफ ) : लक्ष्य सेन विरुद्ध ली जी जिया (मलेशिया) सांयकाळी ६ वाजता

नौकायन - पुरुष डिंगी (ओपनिंग सीरीज ) शर्यत ९ - सांयकाळी ६.१० वाजता

कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६८ किलो वजन गट, १/८ राऊंड : निशा विरुद्ध यूक्रेनची तेतियाना सोवा रिझको - सायंकाळी ६.३० वाजता

नेमबाजी - स्कीट पात्रता मेडल सामना : महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका - सायंकाळी ६.३० वाजता

नौकायन : पुरुष डिंगो (ओपनिंग सीरीज ) - शर्यत १० - सांयकाळी ७.१५ वाजता

कुस्ती : महिला फ्रीस्टाइल ६८ किलो ग्रॅम व्वार्टर फायन (पात्र झाल्यास) निशा - ७.५० वाजता

एथलॅटिक्स : पुरुष ३००० मीटर स्टीपलचेज : अविनाश साबळे - रात्री १०.५० वाजता

कुस्ती : महिला फ्रीस्टाइल ६८ किलोग्रॅम (पात्र झाल्यास) : निशा - रात्री १.१० वाजता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT