aus vs pak twitter
क्रीडा

AUS vs PAK: फिल्डिंग करताना कॅपमुळे बाऊंड्री थांबली! तरीही पेनल्टी का नाही दिली? वाचा कारण

Australia vs Pakistan 3rd Test: ज्यावेळी चेंडू रोखण्यासाठी सईम अयुबने डाईव्ह मारली. त्यावेळी चेंडू त्याच्या कॅपला लागुन थांबला मात्र तरीदेखील ऑस्ट्रेलियाला पेनल्टी स्वरुपात ५ धावा दिल्या गेल्या नाहीत.

Ankush Dhavre

Penalty Rule In Cricket:

पाकिस्तानचा क्रिकेट संघ आणि फिल्डिंचं जरा जवळचं नातं आहे. पाकिस्तानचा संघ फलंदाजी, गोलंदाजीसह आपल्या फिल्डिंगमुळेही नेहमीच चर्चेत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान सईम अयुब दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावला आहे.

फलंदाजी करत असलेल्या स्टिव्ह स्मिथने मिड ऑफच्या दिशेने शॉट मारला. त्यावेळी सईम अयुब चेंडू थांबवण्यासाठी मागे धावत होता. त्यावेळी त्याचा गुडघा ओल्या आऊट फिल्डमुळे अडकला आणि तो कोलांटी उडी खाऊन पडला.

ज्यावेळी चेंडू रोखण्यासाठी सईम अयुबने डाईव्ह मारली. त्यावेळी चेंडू त्याच्या कॅपला लागुन थांबला मात्र तरीदेखील ऑस्ट्रेलियाला पेनल्टी स्वरुपात ५ धावा दिल्या गेल्या नाहीत. असं का झालं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. काय सांगतो नियम?जाणून घ्या.

क्रिकेटच्या नियमानुसार, फिल्डिंग करत असलेल्या संघातील खेळाडूच्या कपड्याला किंवा हेल्मेटला चेंडू लागला आणि चेंडू थांबला तर विरोधी संघाला पेनल्टी स्वरुपात धावा दिल्या जातात.

मात्र सईम अयुबच्या कॅपमुळे चेंडू थांबुनही ऑस्ट्रेलियाला ५ धावा का मिळाल्या नाहीत? तर आयसीसीचा नियम २८.२.२ नुसार या प्रकारच्या घटनेला बेकायदेशीर फिल्डिंग असं म्हणता येणार नाही. पाकिस्तानचा खेळाडूने मुद्दाम कॅपचा वापर करुन चेंडू थांबवला नाही. तर क्षेत्ररक्षण करत असताना कॅप चुकून पडली. त्यामुळेच कॅपला लागुन चेंडू थांबला तरीही ऑस्ट्रेलियाला पेनल्टी धावा मिळाल्या नाहीत. (Latest sports updates)

यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत क्विंटन डी कॉकमुळे दक्षिण आफ्रिकेला पेनल्टी बसली होती. त्याने यष्टीरक्षण करत असताना ग्लोव्ह्ज खाली ठेवले होते. त्यामुळे विरोधी संघाला ५ धावा देण्यात आल्या होत्या. जर झाले असे की, क्षेत्ररक्षकाने बाऊंड्री लाईनवरुन चेंडू फेकला. हा चेंडू अडवताना क्विंटन डी कॉकने एक ग्लोव्ह्ज काढून ठेवला होता. नेमका चेंडू त्याच ग्लोव्ह्जला जाऊन लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT