mohammad amir twitter
Sports

Mohammad Amir: 0,4,4,0,4,6...शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन्सची गरज; पाकिस्तानी गोलंदाजाने हे काय केलं?

Caribbean Premier League 2024 Mohammad Amir Video: कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना, मोहम्मद आमिरने १८ धावा खर्च केल्या.

Ankush Dhavre

एकेकाळी आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर पूर्णपणे फ्लॉप ठरतोय. आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत तो पाकिस्तान संघासाठी खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

या स्पर्धेत त्याला अमेरिकेच्या फलंदाजांनीही धुतला होता. आता कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही स्पर्धेतही त्याची चांगलीच धुलाई झाली आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील एका सामन्यात मोहम्मद आमिरच्या शेवटच्या षटकात १८ धावा कुटल्या गेल्या, या महागड्या षटकामुळे त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात अँटीग्वा अँड बारबुडा फालकन्स आणि गयाना अॅमेजॉन वॉरीयर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील शेवटच्या षटकात असं काही घडलं जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

या सामन्यातील शेवटच्या षटकात गयाना संघाला विजयासाठी १८ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करण्यासाठी अँटीग्वा अँड बारबुडा फालकन्सन संघाकडून अनुभवी गोलंदाज मोहम्मद आमिरकडे सोपवली.

एकाच षटकात खर्च केल्या १८ धावा

या सामन्यातील निर्णायक षटक टाकण्यासाठी मोहम्मद आमिर गोलंदाजीला आला होता. इतका अनुभव असलेल्या गोलंदाजासाठी १६ धावांचा बचाव करणं मोठी गोष्ट नव्हती. मात्र या षटकात त्याने १८ धावा खर्च केल्या.

या सामन्यातील पहिला चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसने त्याची चांगलीच धुलाई केली. त्याने मोहम्मद आमिरचा चांगलाच समाचार घेतला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजाने ०,४,४,०,४,६ अशा एकूण १८ धावा चोपल्या.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर गयानाचा कर्णधार इमरान ताहीरने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अँटीग्वा अँड बारबुडा फालकन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ६ गडी बाद १६८ धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करताना गयाना अॅमेजॉन वॉरीयर्सने २० षटकात ७ गडी बाद १७१ धावा करत सामना आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT