pakistani bowler mohammad amir called fixer by crowd star bowler came back and replied
pakistani bowler mohammad amir called fixer by crowd star bowler came back and repliedtwitter

PSL 2024: PSL मध्ये राडा! मैदानाबाहेर जाताना मोहम्मद आमिर अन् प्रेक्षक भिडले; नेमकं काय घडलं? पाहा Video

Mohammad Amir Viral Video: सध्या पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात व्केटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते
Published on

Mohammad Amir News In Marathi:

सध्या पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात व्केटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने शानदार विजय मिळवला. या विजयासह क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने फ्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना पाहण्यासाठी काही प्रेक्षकांनी मोहम्मद आमिरला फिक्सर म्हटलं. हे शब्द कानावर पडताच मोहम्मद आमिर भडकला. तो इथेच थांबला नाही, तर दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली.

सामन्यानंतर जेव्हा मोहम्मद आमिर आपल्या संघासह पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता त्यावेळी क्रिकेट पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक मोहम्मद आमिरला डिवचताना दिसून आले. हे प्रेक्षक त्याला फिक्सर म्हणून हाक मारत होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, मोहम्मद आमिर आधी पुढे जातो त्यानंतर तो पुन्हा मागे येतो. (Cricket news in marathi)

pakistani bowler mohammad amir called fixer by crowd star bowler came back and replied
WPL 2024, Playoffs Scenario: गुजरातच्या विजयानं RCB चा मोठा फायदा! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

ज्यावेळी तो मागे येतो त्यावेळी तो फिक्सर म्हणून हाक मारणाऱ्यांना भिडतो. यांच्यातील बाचाबाची इतकी वाढली की, शेवटी सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करावी लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. २०१० मध्ये मोहम्मद आमिर फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळून आला होता. त्यानंतर त्याच्यावर आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती.

क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने लाहोर कलंदर्स संघावर शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करत असताना लाहोर कलंदर्स संघाने २० षटकअखेर ४ गडी बाद १६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने २० षटकअखेर ४ गडी बाद १६९ धावा करत सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com