buhvneshwar kumar  twitter
Sports

CPL 2024: पाकिस्तानच्या गोलंदाजाने मोडला Bhuvi चा ऑल टाईम ग्रेट रेकॉर्ड

Mohammed Amir Breaks Bhuvneshwar Kumar Record: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने भुवनेश्वर कुमारचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Most Maiden Overs In T20 Cricket: भुवनेश्वर कुमार हा भारताच सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या स्विंग गोलंदाजीवर जगातील दिग्गज फलंदाज नागिण डान्स करताना दिसून यायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे. भुवनेश्वर कुमारच्या नावे अनेक मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने भुवनेश्वर कुमारचा एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळतोय. या स्पर्धेत खेळताना त्याने भुवनेश्वर कुमारचा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओवर टाकण्याचा रेकॉर्ड हा वेस्टइंडीजचा माजी गोलंदाज सुनील नरेनच्या नावावर आहे.

त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत ५२२ सामन्यांमध्ये ३० मेडन ओव्हर टाकले आहेत. तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शाकीब अल हसनने ४४४ सामन्यांमध्ये २६ मेडन ओव्हर टाकले आहेत. तर भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

भुवनेश्वर कुमार तिसऱ्या स्थानी होता. ज्याने २८६ सामन्यांमध्ये २४ मेडन ओव्हर टाकल्या आहेत.आता मोहम्मद आमीरने त्याला मागे सोडत ३०२ सामन्यांमध्ये २५ मेडन ओव्हर टाकले आहेत. भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत पाचव्या स्थानी आहे. बुमराहने २३३ सामन्यांमध्ये २२ मेडन ओव्हर टाकले आहेत.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर अँटीग्वा आणि बारबाडोस यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात अँटीग्वाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना या संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १७६ धावा केल्या आहेत. यादरम्या जस्टीर ग्रेव्सने ६१ धावांची खेळी केली.

तर बिलिंग्सने ५६ धावा चोपल्या. बारबाडोसला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बारबाडोसला १२७ धावा करता आल्या. इतक्या कमी धावा करुनही या संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार १० धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT