Shubman Gill Pakistan Zindabad controversy saam tv
Sports

Shubman Gill: वादग्रस्त कृत्य! हात मिळवण्याच्या बहाण्यानं पाकिस्तानी चाहत्यानं...! शुभमन गिलसोबत ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं?

Shubman Gill Pakistan Zindabad controversy: सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी अॅडलेडमध्ये आहे. यावेळी भारतीय कर्णधार शुभमन गिलसोबत एका अनपेक्षित घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यामध्ये तीन सामन्यांची वनडे सिरीज आणि ५ सामन्यांची टी-२० सिरीज खेळवण्यात येणार आहे. आज वनडे सिरीजमधील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना एडिलेड ओव्हल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू एडिलेड शहरात फिरताना दिसले. भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि हर्षित राणा एकत्र फिरत असताना त्यांच्यासोबत एक घटना घडली. ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीये.

शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याचं वादग्रस्त कृत्य

शुभमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये गिल आणि राणा दोघंही शांतपणे फिरतायत. अशातच एक व्यक्ती अचानक गिलजवळ येतो. तो एक पाकिस्तानी चाहता असतो. तो गिलकडे हात मिळवण्याची विनंती करतो आणि गिलही त्याच्याशी हस्तांदोलन करतो. पण त्यानंतर तो चाहता ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असं म्हणतोय. हे ऐकून गिल क्षणभर थबकतो. पण शांत स्वभावानुसार तो कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे निघून जातो.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काही लोकांनी या घटनेची तुलना भारत-पाकिस्तान दरम्यानच्या ‘नो-हँडशेक’ वादाशी केली आहे.

‘नो-हँडशेक’ वादाचा संदर्भ

एशिया कप २०२५ दरम्यान भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले होते. मात्र, त्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी एकदाही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नव्हतं. हे पाऊल दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध लक्षात घेऊन उचलण्यात आलं होतं. त्यामुळे गिलसोबत घडलेली ही घटना त्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चेत आली आहे.

शुभमन गिलसाठी निर्णायक सामना

एडिलेडमध्ये होणारा दुसरा सामना शुभमन गिलसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तो पहिल्यांदाच भारतीय वनडे टीमचं नेतृत्व करतोय. सिरीजमधील पहिल्या सामन्यात भारताला ७ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सिरीजमध्ये टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना कशाही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. गिलसाठी हा सामना केवळ नेतृत्व सिद्ध करण्याचा नाही, तर टीमला विजयाच्या मार्गावर नेण्याचीही मोठी संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Best Bus Accident: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात; आरे कॉलनीत बेस्ट बस आणि ट्रकची जबर धडक, व्हिडिओ व्हायरल

ठाकरे बंधूंमध्ये ४ तास खलबतं, बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? VIDEO

SCROLL FOR NEXT