आयसीसी मेन्स अंडर १९ एशिया कप २०२५ च्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या टीमने भारताला पराभूत केलंय. या सामन्यात १९१ रन्सने भारताचा पराभव स्विकारावा लागला आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्या आलेल्याया सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने भारताला ३४८ रन्सचं टार्गेट दिलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात अवघ्या १५६ रन्सवर टीम इंडिया ऑल आऊट झाली.
३४८ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. मात्र त्यानंतर पटापट ४ विकेट्स पडले. कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीची विकेट अली रजा याने घेतली. आयुषने अवघे २ रन्स केले तर वैभवने ३ सिक्स आणि १ फोरच्या मदतीने १० चेंडूंमध्ये २६ रन्सची खेळी केली.
एरॉन जॉर्ज (16 रन्स) आणि विहान मल्होत्रा (7 रन्स) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. विहानची विकेट गेली तेव्हा भारताचा स्कोर 59/4 होता. तर वेदांत त्रिवेदीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र तोही ९ रन्सवर बाद झाला. यानंतर संपूर्ण टीम इंडिया पत्त्यांप्रमाणे ढासळली.
पाकिस्तानच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी केली. यावेळी त्यांनी ८ विकेट्स गमावत ३४७ रन्स केले. पाकिस्तानच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये हमजा जहूर १८ रन्सवर बाद झाला. त्यानंतर समीर मिन्हान्स आणि उस्मान खानने दुसऱ्या विकेटसाठी ९२ रन्सची खेळी केली. उस्मानची विकेट गेल्यानंतर समीर मिन्हान्स अहमद हुसैन सोबत १३७ रन्सची पार्टनरशिप केली.
अंडर-19 आशिया कप ५० ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत भारतासोबत ग्रुप-ए मध्ये पाकिस्तान, मलेशिया आणि यजमान युएई (UAE) या टीम्स होत्या. तर बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ या टीम्सना दुसऱ्या गटात स्थान मिळालं होतं.