New cricket stadium: अमेरिकेच्या भूमीवर क्रिकेटचा नवा अध्याय; ला-ग्रेंजमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन

La Grange cricket stadium: क्रिकेट हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे, परंतु अमेरिकेत त्याचा विस्तार तुलनेने कमी होता. आता या खेळाला अमेरिकन भूमीवर नवा अध्याय मिळाला आहे. ला ग्रेंज मध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आलंय.
La Grange cricket stadium
La Grange cricket stadiumSAAM TV
Published On

अमेरिकेतही आता क्रिकेटचा विकास होताना दिसतोय. याचं कारणं म्हणजे जॉर्जिया जवळील ला-ग्रेंजमध्ये ‘ला-ग्रेंज क्रिकेट स्टेडियम’ या अत्याधुनिक मैदानाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. ला-ग्रेंज क्रिकेट होल्डिंग्ज या संस्थेच्या माध्यमातून उभारलं जाणारे हे स्टेडियम २०२७ मध्ये खुले होणार आहे. यामुळे अमेरिकेत क्रिकेटसाठी कायमस्वरूपी घर ठरणार आहे आणि या प्रदेशातील खेळाची ओळख तयार होण्यास मदत होणार आहे.

कसं आहे हे स्टेडियम?

आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात घेऊन बांधलेलं हे स्टेडियम ४५ एकरांवर पसरलंय. या ठिकाणी १०,००० कायमस्वरूपी सीट्स असणार आहेत. एखादा मोठा कार्यक्रम करायचा झाला तर ही क्षमता २५,००० पर्यंत वाढवता येणार आहे. हे मैदान राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास सक्षम असणार आहे. ज्यामुळे ला-ग्रेंज जागतिक क्रिकेट परिसंस्थेतील एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

फक्त उच्चस्तरीय खेळापुरते मर्यादित न राहता, हे स्टेडियम आर्थिक केंद्रबिंदू आणि प्रादेशिक आकर्षण म्हणून विकसित केलं जातंय. पर्यटनाला चालना देणे, समुदायाचा सहभाग वाढवणे आणि वर्षभर कार्यक्रम आयोजित करणं हा उद्देश आहे. स्थानिक कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रमांसाठीही हे मैदान वापरण्यात येणार आहे.

भारताचा क्रिकेटशी असलेला खोल संबंध या विकासाला विशेष महत्त्व देतो. या भारत–अमेरिका नात्याला अधिक बळकटी देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवीण आमरे, जे भारतीय क्रिकेटचा अनुभव आणि जागतिक दृष्टीकोन या प्रकल्पात आणत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जा पूर्ण करेल आणि त्यात भारतीय स्पर्शही राहील, ज्यामुळे अमेरिकेत क्रिकेटचे जागतिक घर बनण्याचे स्टेडियमचे स्वप्न अधिक दृढ होईल.

La Grange cricket stadium
Team India Playing XI: टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल! पाटीदारचं कमबॅक तर प्रमुख गोलंदाज बाहेर

ला-ग्रेंज क्रिकेट होल्डिंग्जचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केवल पटेल यांनी सांगितलं की, “ला-ग्रेंज क्रिकेट स्टेडियम हे केवळ पारंपरिक मैदान नाही तर ते जागतिक दर्जाचं क्रीडा आणि मनोरंजन केंद्र आहे. सामने आयोजित करण्यापलीकडे जाऊन, हे मैदान चाहत्यांसाठी व समाजासाठी उत्साही केंद्र ठरणार आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र निर्माण करण्याच्या आमच्या बांधिलकीचं प्रतीक आहे.”

La Grange cricket stadium
IND vs AUS: संजू सॅमसनला संधी मिळणार? रोहित कोणाला बसवणार? AUSविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

ला-ग्रेंज क्रिकेट होल्डिंग्जचे मुख्य धोरण अधिकारी प्रवीण आमरे म्हणाले की, “मी उच्चस्तरीय क्रिकेट खेळलो आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केलंय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उभारण्यासाठी काय आवश्यक आहे हे मला चांगली कल्पना आहे. ला-ग्रेंज क्रिकेट स्टेडियम गुणवत्ता आणि जागतिक मानकांवर विशेष लक्ष देऊन विकसित केलं जातंय. खेळपट्टीपासून खेळाडूंच्या सुविधा आणि प्रेक्षकांच्या अनुभवापर्यंत प्रत्येक बाब काळजीपूर्वक आखली जातेय..”

La Grange cricket stadium
Ind Vs Sa: तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनची होणार एन्ट्री; कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता? पाहा कशी असेल प्लेईंग ११

जगभरात २.५ अब्ज चाहते असलेला आणि ११० सदस्य देशांत खेळला जाणारा क्रिकेट हा खेळ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे. अमेरिकेतही व्यावसायिक लीग्स आणि वाढत्या सहभागामुळे त्याचा विस्तार झपाट्याने होतोय. या वाढीमध्ये ला-ग्रेंज क्रिकेट स्टेडियम महत्त्वाची भूमिका बजावणार असून, ते स्पर्धात्मक सामने आयोजित करण्याचे प्रमुख केंद्र तसंच विकासाचे केंद्र ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com