Pakistan vs Sri Lanka World Cup:  Twitter
Sports

Pakistan vs Sri Lanka World Cup: अब्दुल्लाह अन् रिझवानकडून लंका दहन; वर्ल्डकप इतिहासात पाकिस्तानचा रेकॉर्डब्रेक चेज!

Pakistan vs Sri Lanka World Cup: लंकेने दिलेल्या आव्हानाचा डोंगर पाकिस्तानच्या फंलदांजांनी ६ गडी राखून सर केला. पाकिस्तानने वर्ल्डकप इतिहासातील रेकॉर्डब्रेक चेज केला आहे.

Vishal Gangurde

Pakistan vs Sri Lanka World Cup:

पाकिस्तान आणि श्रीलंकेचा आज विश्वचषकातील आठवा सामना राजीव गांधी मैदानावर झाला. श्रीलंकेने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत ३४४ धावा केल्या. लंकेने दिलेल्या आव्हानाचा डोंगर पाकिस्तानच्या फंलदांजांनी ६ गडी राखून सर केला. पाकिस्तानने वर्ल्डकप इतिहासातील रेकॉर्डब्रेक चेज केला आहे. (Latest Marathi News)

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदका माऱ्याचा आक्रमकपणे सामना केला. लंकेच्या कुसल मेंडिसने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगली धुलाई केली.

लंकेसाठी मेंडिसने ७७ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १२२ धावांची वादळी खेळी खेळली. तर समरविक्रमाने ८९ चेंडूत १०८ धावा कुटल्या. समरविक्रमाने एकदिवसीय फॉरमॅटमधील पहिलं शतक ठोकलं. लंकेने ५० षटकात ९ गडी गमावून ३४४ धावा केल्या.

लंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. लंकेने पहिल्या षटकात ६ धावा दिल्या. पाकिस्तानला पहिला धक्का इमाम-उल-हकच्या रुपात बसला.

इमाम १२ धावांत माघारी परतला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम देखील १५ चेंडूत १० धावा केल्या. त्यानंतर शफीक आणि मोहम्मद रिझवाने कमान सांभाळली. शफीकने ५८ चेंडूत अर्धशतक झळकावले. तर रिझवानने देखील ५८ चेंडूत अर्धशतक केले.

शफीक आणि रिझवानने पुढेही संयमी खेळ दाखवला. शफीकने ९७ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर ३४ व्या षटकात शफीक झेलबाद झाला. शफीकने ११३ धावा केल्या. त्यानंतर रिझवान कमान सांभाळत ९७ चेंडूत शतक पूर्ण केले.

महीशच्या गोलंदाजीत शकील बाद झाला. शेवटच्या तीन षटकात २० धावांची गरज असताना रिझवान आणि इफ्तिखारने संयमी खेळ दाखवत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने वर्ल्डकपच्या इतिहासातील रेकॉर्डब्रेक चेज केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अलिबाग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या PNP नाट्यगृहाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

MS Dhoni Net Worth: कॅप्टन कूल धोनीची एकूण संपत्ती नक्की किती? किंमत वाचून व्हाल थक्क

पुणे हादरलं! पोलीस कर्मचाऱ्यानं घरात गळफास घेत आयुष्य संपवलं; तपासात पोलिसांना सापडली महत्वाची गोष्ट | Pune Police

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT