Sports

Pakistan vs Bangladesh: बाबर सेनेचा दमदार विजय, पाकिस्तानने बांगलादेशला ७ गडी राखून नमवलं

Pakistan vs Bangladesh: विश्वचषक स्पर्धेत आज मंगळवारी झालेल्या ३१ व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशलचा ७ गडी राखून पराभव केला.

Vishal Gangurde

Pakistan vs Bangladesh:

विश्वचषक स्पर्धेत आज मंगळवारी झालेल्या ३१ व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशलचा ७ गडी राखून पराभव केला. बांगलादेशचा पराभव केल्याने पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. (Latest Marathi News)

बांगलादेशला विश्वचषकात सहाव्या पराभवाला सामारे जावे लागले आहे. बांगलादेश संघ पराभूत झाल्याने गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तानने चार पराभवानंतर पहिला विजय मिळवला आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात बांगलादेशने ४५.१ षटकात सर्वबाद २०४ धावा केल्या. पाकिस्तानने या आव्हानाचा पाठलाग करताना ३२.३ षटकात ३ गडी गमावून २०५ धावा करत बांगलादेशवर विजय मिळवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीर फखर आणि अब्दुल्ला शफीकने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या पॉवरप्लेमधून पाकिस्तानने नाबाद ५२ धावा कुटल्या. फखर आणि अब्दुल्लाने पहिल्या विकेटसाठी १२७ चेंडूत १२८ धावा कुटल्या.

अब्दुल्ला शफीक ६९ चेंडूत ६८ धावांवर बाद झाला. तर कर्णधार बाबर आझम अवघ्या ९ धावांवर बाद झाला. फखर जमां हा ७४ चेंडूत ८१ धावा करत माघारी परतला. पाकिस्तानच्या संघाने ३२.३ षटकात ३ गडी गमावून २०५ धावा करत बांगलादेश संघाला धूळ चारली. पाकिस्तानसाठी शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम जूनियरने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

SCROLL FOR NEXT