England vs Pakistan Test Match In Multan Twitter/@ICC
Sports

Eng vs Pak : इंग्लडकडून पराभवानंतर पाक कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर, टीम इंडियासमोरही 'हे' मोठे आव्हान

England vs Pakistan Test Match In Multan: पराभवासोबतच पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. बाबर आझमचा संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामातील अंतिम शर्यतीतून बाहेर पडला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Multan Test Cricket Match: मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिका पराभवासोबतच पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. बाबर आझमचा संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामातील अंतिम शर्यतीतून बाहेर पडला आहे.

अंतिम शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते, मात्र तसे होऊ शकले नाही. पाकिस्तानसोबत (Pakistan) इंग्लंडचा संघही अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. जाणून घेवूया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी काय आहे टीम इंडियाची परिस्थिती. (Cricket Latest News)

ऑस्ट्रेलियन संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 12 पैकी 8 कसोटी जिंकल्या असून 75 टक्के गुण आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ६० टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ५३.३३ टक्के गुणांसह श्रीलंकेच्या संघाचा क्रमांक लागतो. टीम इंडियाबद्दल (Team India) बोलायचे झाले तर ती सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आणि त्याचे दोन सामने अनिर्णित राहिले. भारतीय संघाची टक्केवारी सध्या 52.08 आहे. यानंतर ४४.४४ टक्के गुणांसह इंग्लंडचा क्रमांक लागतो. पाकिस्तान संघाबद्दल बोलायचे झाले तर तो ४२.४२ टक्के गुणांसह सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. (Latest Marathi News)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला सहापैकी पाच सामने जिंकावे लागतील. भारताला या महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडियाने 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा पराभव केल्यास श्रीलंकेला मागे टाकून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर येईल. तर भारताला टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारपैकी तीन कसोटी सामने जिंकावे लागतील.

काय सांगतो आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा नियम?

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या नियमानुसार, संघाला कसोटी सामना जिंकण्यासाठी 12 गुण, ड्रॉसाठी 4 आणि टाय झाल्यास 6 गुण मिळतात. यासह, सामना जिंकण्यासाठी 100 टक्के, टायसाठी 50 टक्के, ड्रॉसाठी 33.33 टक्के आणि पराभवासाठी शून्य टक्के गुण जोडले जातात. ही रँकिंग प्रामुख्याने पॉइंट टेबलमधील विजयाच्या टक्केवारीद्वारे निर्धारित केली जाते. त्यामुळेच जास्त सामने जिंकूनही भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या मागे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये ओव्हलवर खेळवला जाणार आहे.

Edited By - Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT