काश्मीरच्या पहलागाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला भारताने घेतला. बुधवारी (७ मे) मध्यरात्री भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी संयुक्तरित्या ही ऑपरेशन सिंदूर राबवले. या हवाई हल्ल्यामध्ये ९० दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये काही कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश झाला असून त्यात याकूब मुगलही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
याकूब मुगल हा पाकिस्तानमधील बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख कॅम्पचा प्रमुख होता. भारतविरुद्ध अनेक कारवायांमागे याकूब मुगल होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये याकूब मुगल मारला गेला. त्याच्या अंत्यविधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मूळ गावी धार्मिक पद्धतीने मुगलचे अंत्यविधी पार पडले. तेव्हा अनेक कट्टरवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती उपस्थित होते.
एका बाजूला आमचा दहशतवाद्यांशी संबंध नाही असे पाकिस्तान म्हणत असते. पण दुसऱ्या बाजूला याकूब मुगलसारख्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी उपस्थित राहिल्याने पाकिस्तानच्या दुतोंडी वागण्यावर सडकून टीका केली जात आहे. याकूब मुगल भारतविरोधी दहशतवादी कारवायांचा प्रमुख सूत्रधार मानला जात होता.
याकूब मुगलच्या नेतृत्वाखाली शस्त्रास्त्र हाताळणी करणे, स्फोटके तयार करणे, आणि दहशतवादी हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जात होते. जम्मू-काश्मीरमधील पुंछ, राजौरी आणि इतर भागांतील अनेक घातपातांमध्ये त्याचा थेट सहभाग होता, असे भारताच्या गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. दरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये याकूब मुगल ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी पाकिस्तानी अधिकृत यंत्रणांनी त्याच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.