Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांना मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद क्रिकेटच्या जगतावर पडत आहेत. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेटसंबंधांवर परिणाम होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारतात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सिनेसेलिब्रिटींपासून ते क्रिकेटजगतातील मंडळींनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीने केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. यामुळे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये असे अनेकजण म्हणत आहेत. दरम्यान हल्ल्यामुळे बीसीसीआय ॲक्शन मोडवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांची अनौपचारिक चर्चा झाली आहे. पुढील काही दिवसात बीसीसीआय लवकरच बैठक घेऊन भारत-पाकिस्तान क्रिकेटविषयी निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यापुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका कधीही खेळवणार जाणार नाही असा निर्णय घेतला जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामने होतील की नाही, यावरही चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला काही दिवसांपूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी भारत-पाकिस्तान मालिका व्हावी असे म्हटले होते. पण आता दोन्ही देशांत मालिका होणार नसल्याचे एकाप्रकारे स्पष्ट झाले आहे. दरम्यान बीसीसीआय पाकिस्तानशी असलेल्या क्रिकेट संबंधांवर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.