Pahalgam Terrorist Attack X
Sports

Pahalgam Attack : निष्पाप भारतीयांची हत्या करणे हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, पहलगाम हल्ल्यावर संतापला माजी क्रिकेटपटू

Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचे पडसाद क्रिकेट विश्वावरही पडल्याचे पाहायला मिळत आहेत. दु:खद घटनेवर अनेक क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यामध्ये २८ जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. याच दरम्यान माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीने सोशल मीडियावर केलेल्या एक्स पोस्टची चर्चा होत आहे.

'..आणि म्हणूनच मी म्हणतो, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नका. आताही नाही, पुढेही नाही, कधीच नाही. जेव्हा बीसीसीआय किंवा सरकारने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या क्रिकेट संघाला पाठवण्यास नकार दिला, तेव्हा 'अरे खेळ राजकारणापेक्षा वरचढ असलं पाहिजे' असे काहीजणांनी बोलायचे धाडस केले होते. माझ्या मते, निष्पाप भारतीयांची हत्या करणे हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे. ते जर असेच खेळत असतील, तर त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे,' असे गोस्वामीने म्हटले आहे.

'मी संतापलो आहे. उद्धवस्त झालो आहे. काही महिन्यांपूर्वी मी लेजेंड्रस लीगसाठी काश्मीरला गेलो होतो. या निमित्ताने पहलगामला फिरलो, तेथील स्थानिक नागरिकांना भेटलो. त्यांच्या डोळ्यात आशा परतताना दिसली. सर्वकाही शांत झाले असे वाटत असताना असे पुन्हा हा रक्तपात. अशा गोष्टी तुम्हाला आतून उद्धवस्त करतात', असे पोस्टमध्ये श्रीवत्स गोस्वामीने लिहिले आहे.

श्रीवत्स गोस्वामी ६१ फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. यात त्याने ३,०१९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही त्याने सहभाग घेतला होता. सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून तो खेळले आहे. आयपीएलच्या ३१ सामन्यांमध्ये गोस्वामीने २९३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

Maharashtra Politics : माणिकराव कोकाटे राहणार की, जाणार? साडेसाती टाळण्यासाठी कृषीमंत्री शनिचरणी?

Maharashtra Live News Update: पावसाळ्यात बीडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात "होडी चलाव" आंदोलन

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह झाला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT