prize money of ipl 2024 saam tv
Sports

IPL 2024 Prize Money: विराटला ऑरेंज तर हर्षल पटेलला पर्पल कॅप; पाहा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची संपूर्ण यादी

IPL Prize Winnner List: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतील विजेता संघ ठरला आहे. फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी धुव्वा उडवत या संघाने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. या स्पर्धेतही युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला आहे. काही युवा फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला.

तर काही युवा गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धेनंतर कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळाला? जाणून घ्या.

विजेत्या संघाला २० कोटी रुपये

ही स्पर्धा जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० कोटी रुपये मिळाले

उपविजेत्या संघाला १२.५ कोटी

फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संधावरही पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे. या संघाला १२.५ कोटी रुपये मिळाले.

इमर्जिंग प्लेअर

आयपीएल २०२४ स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअर पुरस्कार सनरायझर्स हैदराबादचा २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीला मिळाला आहे. या हंगामातील १३ सामन्यांमध्ये त्याने ३३.६७ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या. तर गोलंदाजीत ३ गडी बाद केले. त्याला १० लाख रुपये मिळाले.

स्ट्राइकर ऑफ द सीजन -

दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज जॅक फ्रेजर मॅकगर्कला हा पुरस्कार मिळाला. त्याने ९ सामन्यांमध्ये ३३० धावा केल्या. त्यालाही १० लाख रुपये मिळाले.

फॅंटसी प्लेअर ऑफ द सीजन

कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू सुनील नरेनने फॅंटसी प्लेअर ऑफ द सीजनच्या पुरस्कारावर नाव कोरलं. त्यालाही १० लाख रुपये मिळाले.

सुपर सिक्सेस -

हा पुरस्कार ४२ षटकार मारणाऱ्या अभिषेक शर्माला दिला गेला. त्याला देखील १० लाख रुपये मिळाले.

ऑन द गो फोर्स -

हा पुरस्कार ६४ चौकार मारणाऱ्या ट्रेविस हेडला देण्यात आला. यासह त्याला १० लाख रुपये मिळाले.

कॅच ऑफ द सीजन -

कॅच ऑफ द सीजनचा पुरस्कार कोलकाता नाईट रायडर्स संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रमनदीप सिंगला दिला गेला. यासह त्याला १० लाख रुपये मिळाले.

प्लेअर ऑफ द टुर्नामेंट -

या स्पर्धेत ४८८ धावा आणि १७ गडी बाद करणारा सुनील नरेन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्याला देखील १० लाख रुपये मिळाले.

ऑरेंज कॅप -

या स्पर्धेत सर्वाधिक ७४१ धावा करणारा विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. त्याला देखील १० लाख रुपये मिळाले.

पर्पल कॅप -

या स्पर्धेत सर्वाधिक २४ गडी बाद करणारा हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी ठरला. त्याला देखील १० लाख रुपये मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT