Aurangabad News Saam Tv
Sports

Aurangabad: क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

या कारवाईत दोन लाख 21 हजार रुपयाच्या मुद्देमालासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) पर्दाफाश केला आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहराजवळील वाळूज एमआयडीसी परिसरातल्या रांजणगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन लाख 21 हजार रुपयाच्या मुद्देमालासह सात जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील गुन्हे आणि सायबर विभागाच्या पथकाला वाळूज परिसरात सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पहाटे छापा टाकून जुगार अड्डयावरून जुगाऱ्यांसह २ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Aurangabad Crime Latest News)

हे देखील पहा -

सूरज पंडित हा क्रिकेटच्या मॅचवर फोनद्वारे पैसे लावून सट्टा घेत होता. भाड्याच्या घरात तो ऑनलाइन सट्टा खेळताना व खेळविताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर पूनमसिंग ठाकूर याच्या सांगण्यावरून आपण हा सट्टयाचा धंदा चालवतो अशी माहिती मिळाली. त्याच्यासोबत विठ्ठल धनसिंग काकस हा सट्टयावर लावलेले पैसे जमा करीत असल्याचे दिसून आले.

या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी प्रशांत ठाकूर, सूरज पंडित, विठ्ठल काकस याच्यासह सुरेश रामराव नरवडे, सुरेश रामचंद्र दुबिले, प्रभाकर सूर्यभान काजळे, सुदाम राधाकिसन काळजे या सात जणांना अटक केली. हे सर्व दुसऱ्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून सीमकार्ड खरेदी करीत सट्टा खेळवत होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT