Shubman Gill reaction after drop saam tv
Sports

Shubman Gill: नशीबात असलेलं कोणी हिरावू शकत नाही...! टी-२० वर्ल्डकपमधून वगळल्यावर शुभमन गिलने सोडलं मौन

Shubman Gill reaction after drop: टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून त्यात युवा फलंदाज शुभमन गिलला स्थान मिळाले नाही. अखेर शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

फेब्रुवारीपासून टी-२० वर्ल्डपला सुरुवात होणार आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये शुभमन गिलचा समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान यावर अखेर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने मौन सोडलंय. टी-२० वर्ल्डकपमधून वगळण्यानंतर भारताचा वनडे आणि टेस्ट कर्णधार शुभमन गिलने शनिवारी सांगितलं की, तो सिलेक्टर्सच्या निर्णयाचा आदर करतो. ज्यावेळी त्याला संधी मिळेल तेव्हा तो त्याच्या त्याचं सर्वोत्तम देणार आहे.

काय म्हणाला शुभमन गिल?

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या सिरीजमधील पहिल्या वनडे सामन्यापूर्वी गिल म्हणाला, मी जिथे असायला हवं होतं तिथे मी आहे. माझ्या नशिबात जे आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खेळाडू नेहमीच असा विश्वास ठेवतो की, तो देशासाठी त्याचं सर्वोत्तम देईल. सिलेक्टर्सने त्यांचा निर्णय घेतला आहे. मी नेहमीच वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करतो.

गिल म्हणाला, कोणताही फॉर्मॅट सोपा समजून घेऊन खेळला पाहिजे. जर तुम्ही ते पाहिलं तर २०११ पासून टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप जिंकलेला नाही. त्यामुळे कोणताही फॉरमॅट सोपा नसतो आणि त्यासाठी खूप मेहनत असते.

कोलकातामध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मानेला झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिलला गेल्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये आणि त्यानंतरच्या वनडे सिरीजला मुकावं लागलं होतं. शुभमन म्हणतो की, सामना चुकवणं आणि टीमचा खेळ पाहणं कधीच सोपं नसतं. कर्णधार म्हणून खूप काही करायचंय.

पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी गिलची निवड झालेली नाही. दरम्यान गिल क्रिकेटच्या दोन आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये भारताचं नेतृत्व करतोय. गिलने भारतासाठी ३६ टी-२० सामन्यांमध्ये २८.०३ च्या सरासरीने आणि १३८.५९ च्या सरासरीने ८६९ रन्स केलेत.

पहिल्या वनडेसाठी कशी असेल प्लेईंग ११

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT