

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ पूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली आहे. टीमचा युवा खेळाडू तिलक वर्माला दुखापत झाल्याने त्याला न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांपैकी ३ सामन्यांमधून तिलकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी तिलकला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो उद्या हैदराबादमध्ये परतणार आहे.
तो बरा झाल्यानंतर पुन्हा सरावाला सुरुवात करणार आहे. मात्र त्यापूर्वी न्यूझीलंडविरूद्धच्या तीन टी-२० सामन्यांमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर तो सरावात कसा खेळ करतो यावर त्याला उर्वरित सामन्यांमध्ये खेळवायचं का नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे.
दुखापतीमुळे तिलक वर्मा बाहेर होणं हा टीम इंडियाच्या वर्ल्डकप मिशनसाठी एक मोठा झटका मानला जातोय. एशिया कप २०२५ च्या फायनलचा हिरो आणि मिडल ऑर्डरचा एक तुफान फलंदाज तिलक वर्माला दुखापत झाली आहे. वर्ल्डकप सुरु होण्यासाठी एका महिन्यापेक्षाही कमी वेळ उरला असल्याने ही सर्वात मोठी चिंता व्यक्त करण्यात येतेय.
तिलकची विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादकडून खेळताना अचानक तब्येत बिघडली. यावेळी त्याला वेदना होऊ लागल्या आणि त्याला तातडीने गोकूळ रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तपासणी केली असता त्याला टेस्टिकुलर टॉर्शनचं निदान झालंय. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
टीम इंडियाचा उपकर्णधार आणि मिडल ऑर्डरचा फलंदाज श्रेयस अय्यरला बंगळूरूच्या मेडिकल टीमने फीट घोषित केलं आहे. यावेळी श्रेयसने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगला खेळही केला. मुंबईकडून हिमाचल प्रदेशविरूद्ध खेळताना ५३ बॉल्समध्ये ८२ रन्स केले.
11 जानेवारी: पहिली वनडे, वडोदरा
14 जानेवारी: दूसरी वनडे, राजकोट
18 जानेवारी: तीसरी वनडे, इंदौर
21 जानेवारी: पहिली टी20, नागपुर
23 जानेवारी: दूसरी टी20, रायपुर
25 जानेवारी: तीसरी टी20, गुवाहाटी
28 जानेवारी: चौथी टी20, विशाखापत्तनम
31 जानेवारी: पांचवी टी20, तिरुवनंतपुरम
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.