Prime Ministers Shahbaz sharif Saam
Sports

IND vs Pak : ठरलं! गरीब पाकिस्तानानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, भारताविरुद्ध T20 वर्ल्डकप सामना खेळणार नाही

India vs Pakistan T20 World Cup match update : टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध सामना खेळणार नसल्याचा निर्णय पाकिस्तानने पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे भारताला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Pakistan refuses to play India in T20 World Cup : टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नसल्याचे आता जवळपास निश्चित झालेय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी भारताविरूद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणार्‍या सामन्याबाबत पाकिस्तानने स्पष्ट भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णायानंतर आता आयसीसीकडून काय निर्णय जारी करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. (India Pakistan T20 World Cup match boycott news)

आम्ही भारताविरोधात खेळणार नाही. शनिवारपासून भारतामध्ये टी२० विश्वचषक रंगणार आहे. या विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तान खेळणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली आहे. ही माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिली आहे. दरम्यान, याआधीच बांगलादेशने टी२० विश्वचषकातून माघार घेतली होती. आता पाकिस्तानने भारताविरोधात खेळण्यास नकार दिलाय. दरम्यान, आयसीसीकडून पाकिस्तानला भारातविरोधातील सामन्यात न खेळल्यास मोठा फटका बसण्याचे गणित सांगितले होते.

इस्लामाबादमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळासमोर बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध खेळणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी बोलताना शाहबाज शरीफ म्हणाले की, त्यांनी काळजीपूर्वक विचार केल्यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खेळात राजकारण नसावे असे ते म्हणाले. त्यांनी हा "न्याय्य निर्णय" असल्याचे म्हटले.

पाकिस्तान संघाचे नुकसान (Sporting Loss)

पाकिस्तान मैदानात उतरला नाही, तर आयसीसीच्या नियमांनुसार टीम इंडियाला 'वॉकओव्हर' (Walkover) दिला जाईल. म्हणजेच कोणताही सामना न खेळता भारताच्या खात्यात २ गुण जमा होतील. नियमांनुसार, सामना न खेळल्यास पाकिस्तानचा स्कोअर '०' धरला जाईल, ज्यामुळे त्यांचा नेट रन रेट खूपच घसरू शकतो. यामुळे पाकिस्तानला स्पर्धेच्या पुढील फेरीत (Super 8) पोहोचणे कठीण होईल.

पाकिस्तानचे आर्थिक नुकसान (Financial Loss)

भारत-पाकिस्तान सामना हा जागतिक क्रिकेटसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतो. हा सामना रद्द झाला, तर प्रसारक (Broadcasters) आणि जाहिरातदारांचे सुमारे कोट्यवधि रूपयांचे नुकसान होऊ शकते. आयसीसी हा तोटा भरून काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठा दंड ठोठावू शकते. आयसीसीकडून सदस्य देशांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. या नियमांच्या उल्लंघनामुळे पाकिस्तानला मिळणारा हा निधी रोखला किंवा कमी केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला; पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या खाल्ल्या अन् अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?

Plain Saree Designs: रोज घालण्यासाठी प्लेन साड्याचे लेटेस्ट 5 पॅटर्न, लाल रंग खूपच भारी

Maharashtra Live News Update: इंडिगोकडून इराण हवाई क्षेत्राबाबत ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी

Crime: महिलेने लिव्ह इन पार्टनरचे गुप्तांग कापलं, दुधातून गुंगीचे औषध दिलं, त्यानंतर मध्यरात्री...

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

SCROLL FOR NEXT