Maharashtra News Live Update: कल्याण एपीएमसी मार्केट सेंटरमध्ये न्यायाधीशांची गाडी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवली

Marathi Breaking Live Headlines Updates: मुंबईसह अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On

कल्याण एपीएमसी मार्केट सेंटरमध्ये न्यायाधीशांची गाडी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवली

कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परविन सय्यद यांची गाडी दीड तासापासून परीक्षार्थी रोखून ठेवले आहेत

रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला गेलेला तरुण काळ नदीत बेपत्ता

रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला गालबोट लागल आहे. गेल्या महिन्याभरात तीन ते चार पर्यटकांचा पावसाळी पर्यटना दरम्यान मृत्यू झाला असून आज महाडमध्ये काळ नदी पात्रात एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. वेदांत बोंडलेकर वय वर्ष 20 राहणार निजामपुर असे या तरुणाचे नाव आहे. महाड तालुक्यातील पाने येथील धबधबा आणि काळ नदीला जोडणाऱ्या भागात हि दुर्घटना घडली. सदर तरुण पाण्यात मौजमजा करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस, बचाव पथक घटना स्थळी दाखल झाले असून बेपत्ता तरुणाचा शोध सुरु आहे.

अभिजीत दिपकेंच्या भेटीनंतर संतुक पिंपरी शाळेची तातडीने दुरुस्ती सुरू

हिंगोलीतील संतुक पिंपरी जिल्हा परिषद शाळेची प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. अभिजीत दिपके यांनी ‘सरकारी स्कूल ठीक करू’ अभियानांतर्गत या शाळेला भेट देत समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शौचालयाची दुरुस्ती तसेच खिडक्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या सूचनेनंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशीही कामाला सुरुवात केली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांवर महत्त्वाची बैठक; उद्योजकांनी मांडल्या समस्या

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील विविध प्रश्नांवर चाकणमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत ऑनलाइन सहभागी झाले आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी आणि उद्योजक बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी उद्योजकांनी औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या आणि अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा सुरू आहे.

संभाजीनगरमध्ये हायकोर्ट टायपिंग परिक्षेत गोंंधळ दिपके आंदोलनस्थळी

संभाजीनगरमध्ये हायकोर्ट टायपिंग परिक्षेत गोंंधळ दिपके आंदोलनस्थळी

दिपकेंचे विद्यार्थांसोबत चर्चा सुरु

आमच्यावर आता जीवनसंपवण्याची वेळ - विद्यार्थी

१५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा

माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रील अपलोड करता येणार आहे.

"जे काही टीकाटिप्पणी होते त्यासाठी मी इथं आलेलो नाही. मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना न्याय द्यायचाय. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही सोल्युशन्सच्या संदर्भामध्ये आमच्या धनंजय मुंडेंबरोबर आणि असोसिएशनच्या लोकांबरोबर बोलत होते. दोन-तीन रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीने करू शकलो, तर २५% याच्यातून रिलीफ मिळणार आहे."
लक्ष्मण हाके

नागपुरात वाडी एमआयडीसीतील प्रदूषित पाणी सोडल्यामुळे अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती. या विषयाला आमदार परीनय फुके आणि संजय भेंडे यांनी वाचा फोडण्याचे काम केलं. त्यामुळे आपलं सरकार असलं तरी जनतेशी आपण प्रामाणिक असले पाहिजे असे म्हणत सांगत दोन्ही आमदारांचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केलं.

उद्योगमंत्री चाकण दौऱ्यावर शेतकऱ्याचा संताप घर जातंय पीएमआरडीए अधिकाऱ्यांची दादागिरीचा आरोप

उद्योगमंत्री उदय सामंत चाकण दौऱ्यावर असतानाच रस्त्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या कामासाठी जमीन घेताना पीएमआरडीएचे अधिकारी दादागिरी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

रस्त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनात आमचे घरही बाधित होत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरांवरच घाला घातला जात असेल तर आमचा विचार कोण करणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात भाजपमध्ये पक्षांतर्गत गट सक्रिय

भाजपचे ज्येष्ठ नेते भीमाशंकर हासुरे यांनी जळकोट येथे आयोजित केलेल्या छत्री वाटप कार्यक्रमाच्या जाहिरात, निमंत्रण पत्रिका, बॅनरवर राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव नाही

आमदार राणा पाटील यांचे प्रतिस्पर्धी असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बॅनर वर फोटो निमंत्रण पत्रिकेवर नाव

आमदार राणा पाटील यांना त्यांच्याच तुळजापूर मतदार संघातील कार्यक्रमात डावल्याने चर्चांना उधान

कार्यक्रमास भाजपाचे आमदार बसवराज पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव गुंड हे उपस्थित

मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मराठा अभ्यासकांनी मांडली मत

गाव स्तरीय समितीला संविधानिक अधिकार द्यावेत.. त्यांनी केलेली शिफारस मान्य करण्यात यावी...

मराठवाड्यात ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या नोंदी शोधण्यात याव्यात.. शिंदे समितीने काम केले नाही...

मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी आहे.. हे सरकारने मान्य करावे ..

ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे सध्याच्या GR मुळे शक्य नाही....

व्हॅलीडीटी कायद्यात सुधारणा करावी.....2001 आणि 2012 च्या कायद्यात सुधारणा हवी

शेवगाववरून नगरकडे येत असताना आलमगीर येथील युवकाचा भीषण अपघातात मृत्यू

शेवगाववरून नगरकडे येत असताना आलमगीर येथील युवकाचा भीषण अपघातात मृत्यू...

तिसगावजवळ पिकअप चारचाकी वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने 36 वर्षीय इलीयास शेख यांचा जागीच मृत्यू...

अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद तर शेख हे दुचाकीवर करत होते प्रवास..

श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन 

शेतकरी थेट पाण्याच्या टाकीवर चढले...

श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन...

अकारि पडीत जमिनी मूळ मालकांना परत देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन...

तालुक्यातील नऊ गावांचा प्रश्न ब्रिटिश काळापासून प्रलंबित...

दोन वर्षांपूर्वी उच्च नात्यालयाने दिलेत जमिनी मुळ मालकांना परत करण्याचे निर्देश...

मंत्रिमंडळात निर्णय होऊनही जमिनी परत मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक...

ए आय टेक्नॉलॉजी मुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले

Ai टेक्नॉलॉजी वापरून ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक कारखान्याने 25 शेतकऱ्यांना निवडले आहे. ai टेक्नॉलॉजी चा वापर करून जिरायती भागात देखील उसाचे उत्पादन घेतले आहे. जिरायती भागात पाणी कमी असल्याने कमी पाण्यात देखील ai टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे उसाचे चांगले उत्पादन घेता येते याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मंत्री येणार म्हणून घाईघाईत काम, चाकण तळेगाव रोडवर एका तासातच कामाचा बोजवारा

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या चाकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घाईघाईत रस्त्याची डागडुजी सुरू केली. चाकण तळेगाव रोडवर साईड पट्ट्या भरण्याचे काम सुरू असतानाच अवघ्या एका तासात या कामाचा बोजवारा उडाला आणि एक रिक्षा मातीमध्ये अडकली.

मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत अभ्यासकांसह मराठा आंदोलकांसोबत बैठक सुरू 

मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत अभ्यासकांसह मराठा आंदोलकांसोबत बैठक सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक 29 ऑगस्ट च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे. या बैठकीनंतर मराठवाडा दौऱ्याचे नियोजन देखील होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकूळ, 7 ते 8 दुकानं फोडले

- वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकूळ, सात ते आठ दुकानं फोडले

- ज्वेलर्सच्या दुकानासह मेडिकल, किराणा, डेली नीड्स दुकानात चोरी

- दोन ठिकाणी ठिकाणी चोरीचा प्रयत्न तर पाच ते सहा ठिकाणी चोरी केल्याची प्राथमिक माहिती

Pune : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

मास्टर स्ट्रोक

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद निमन, मनसेचे प्रमोद गवळी, वैष्णवी किराड भाजपमध्ये करणार प्रवेश

अमोल बालवडकर प्रतिस्पर्धी म्हणून प्रमोद निम्हण यांची ओळख

बाणेर बालेवाडी परिसरातच अमोल बालवडकर ला रोखण्यासाठी चंद्रकांत दादांचा मास्टर स्ट्रोक

नंदुरबार शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तीव्र संताप

सत्ताधारी आमदारांनाच वाटते खड्ड्याची लाज

नंदुरबार शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तीव्र संताप

खड्ड्यांना बघून नंदुरबार मध्ये यायला लाज वाटते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रशासनावर टीका

Raigad : सोनीया गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक

सोनीया गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक

रायगडच्या माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गा आडवून केला सोनिया गांधी यांचा निषेध

स्वांतत्र्य दिनी राष्ट्रगीता अपमान केल्या प्रकरणी रायगडमध्ये भाजपने केला सोनिया गांधी यांचा निषेध

गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

नंदुरबार शहरासह , धडगाव,अक्कलकुवा आणि मोलगी परिसरात मुसळधार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता..

Nandurbar : नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई! 10 लाखांच्या मुद्देमालासह सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई! 

पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

इम्रान शेख खालीद शेख असे 30 वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 10 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा अभिलेखावरील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पंढरपुरात भाविकांची गर्दी; दर्शनाची रांग गोपाळपूर रोड पर्यंत

सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत गेली आहे.

आज पंढरपुरात जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली आहे.

Pune : चाकणच्या उद्योजकांना माथाडीच्या नावाखाली गुंडगिरीचा त्रास

चाकण औद्योगिक परिसरातील उद्योजक आधीच वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त असताना आता माथाडीच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गुंडगिरीने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी चाकणमधील ओम लॉजिस्टिक्सच्या कर्मचाऱ्याला माथाडीच्या मुद्द्यावरून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

Nashik : नाशिक CBS परिसरात बसमध्ये चढण्यावरून तरुणांमध्ये राडा

* नाशिक CBS परिसरात बसमध्ये चढण्यावरून तरुणांमध्ये राडा

* बस पकडण्याच्या घाईत तरुणांमध्ये थेट मारामारी

* मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अंबरनाथमधील मनसे भाजपा राडा प्रकरण

अंबरनाथमधील मनसे भाजपा राडा प्रकरण

भाजपाच्या २ नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा दाखल

मनसेकडून निघणारा आजचा मोर्चा रद्द

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्यास पुन्हा विलंब

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्यास पुन्हा विलंब

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलै रोजी माण ते बालेवाडी १२ स्थानकांच्या मार्गाला प्रवासी वाहतुकीची मंजुरी दिली

मंजुरी मिळून तीन आठवडे उलटले तरी मेट्रो सेवा अद्याप सुरू नाही

Malegaon: मालेगावच्या गिरणा नदी पत्रालागत एसिड सदृष्य रासायनिक ड्रम फेकले

मालेगावच्या गिरणा नदी पत्रालागत एसिड सदृष्य रासायनिक ड्रम फेकले

नाशिकच्या मालेगाव मधील म्हाळदे शिवारातील गिरणा नदी लगतच्या काठावर अज्ञात व्यक्तीने अंदाजे 200 लिटर क्षमतेचे एसीड सदृष्य रासायनिक ड्रम मोकळ्या जागेत फेकल्याने खळबळ उडाली

या रासायनिक पदार्थाच्या उग्रवासाने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे

हे ड्रम ज्यांनी फेकले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे

Pimpari Chinchwad: आलिशान मर्सिडीज कारणे घेतला पेट, आगीत आलिशान कार पूर्ण जळून खाक

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरामध्ये एक आलिशान मर्सिडीज कारने अचानक पेट घेतला आहे.

चिखली परिसरातील शिव रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर एका आलिशान शमर्सिडीज कारने अचानक पेट घेतला आहे.

मर्सिडीज कारच्या इंजन आणि बोनट ने पेट घेतल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून कारला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.

कारला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे

Amravati: NCMC कार्डसाठी प्रवाशांची अडवणूक केल्यास वाहकांवर कारवाईचा इशारा

अमरावतीमध्ये एनसीएमसी कार्डसाठी प्रवाशांची अडवणूक केल्यास वाहकांवर कारवाईचा इशारा

अमरावती जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

कार्ड काढण्यासाठी प्रवाशांना आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख प्रवाशांची नोंदणी झाली असून, सुमारे चार लाख कार्ड अॅक्टिव्हेट करण्यात आली आहेत.

मात्र, कार्ड काढण्यासाठी किंवा कार्डबाबत माहिती देताना काही वाहकांकडून टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

प्रवाशांची अडवणूक, चुकीची माहिती किंवा अनावश्यक टाळाटाळ केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा एसटी प्रशासनाने दिला आहे.

Nashik:  नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला आता ८ डिसेंबरपर्यंत ब्रेक

नाशिक -

- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला आता ८ डिसेंबरपर्यंत ब्रेक

- राष्ट्रीय हरित लवादाने निर्बंध कायम ठेवत पुढील सुनावणी 8 डिसेंबरला घेण्याचे दिले आदेश

- वृक्षतोडीविरोधातील याचिकेवर शुक्रवारी झाली सुनावणी

- पुढील सुनावणी आता ८ डिसेंबरला होणार

- निर्णयामुळे साधुग्रामच्या कामांना पुन्हा लागणार ब्रेक

- सिंहस्थाच्या कामांवर परिणामाची शक्यता

Navi Mumbai: नवी मुंबईत 'सकाळ हेल्थ सिटी रन' उत्साहात संपन्न, ३ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

नवी मुंबईत 'सकाळ हेल्थ सिटी रन' उत्साहात संपन्न

तीन हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

रविवारी नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

या स्पर्धेत दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा दोन श्रेणींमध्ये, तीन हजारांहून अधिक धावपटूंनी धावण्याचा आनंद घेतला.

Raigad: महाड MIDC तील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती, एका कामगाराचा मृत्यू

- महाड MIDC तील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती

- आठ जणांची प्रकृती बिघडली

- एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik: सलग सुट्या आणि श्रावणामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी

नाशिक -

- सलग सुट्या आणि श्रावणामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी

- देशभरातून आलेल्या भाविकांच्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा

- भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यात व्हीआयपी दर्शन बंद

- तर त्र्यंबकेश्वर मंदिरात बॅग-पिशव्या नेण्यास सक्त मनाई

- भाविकांची गर्दी आणि श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय

Nashik: सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

नाशिक -

- सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

- नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचे काही दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते अनावरण

- पंतप्रधान, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो

- फोटोच्या खाली पालकमंत्री व कुंभ पर्व मंत्री गिरीश महाजन असा पुस्तिकेवर उल्लेख केल्याने पुन्हा नाशिक पालकमंत्री पदाच्या चर्चांना उधाण

- नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

Pune: वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

पुणे -

वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

पहिली गुणवत्ता यादी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर होणार

वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस शनिवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे

Dharashiv: तुळजाभवानीचं तुळजापुर आता अद्यावत 233 सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

धाराशिव -

तुळजाभवानीचं तुळजापुर आता अद्यावत 233 सिसिटिव्हीच्या निगराणीखाली

तुळजाभवानी मंदीर परीसरासह शहरातील मुख्य भागात लावले सिसिटिव्ही कॅमेरे

गुन्हेगारांवर राहणार सिसिटिव्हीची नजर तर भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीवर राहणार नजर

तुळजापुर शहरातील प्रवेशद्वारे, गर्दीची व संवेदनशील 62 ठिकाणी 233 विविध प्रकारचे सिसिटिव्ही कॅमेरे कार्यान्वित

नियंञण कक्षातुन नागरीकांना सुचना देण्यासाठी 30 ठिकाणी स्पीकर तर तात्कालिक परिस्थितीत धोक्याची सुचना देण्यासाठी 15 ठिकाणी अलार्म सिस्टीम कार्यान्वित

Jalna: अंतरवाली सराटीत आज मराठा अभ्यासकांची दुपारी १२ वाजता होणार बैठक

जालना -

अंतरवाली सराटीत आज मराठा अभ्यासकांची बैठक, दुपारी बारा वाजता होणार बैठक....

बैठकीनंतर मराठवाड्याच्या दौऱ्याचे होणार नियोजन, मराठवाड्यातील मराठा आंदोलकांना देखील चर्चेसाठी बोलावलं...

राज्यातील मराठा आरक्षणाचा अभ्यास असणाऱ्या अभ्यासकांना मनोज जरांगे यांनी चर्चेसाठी अंतरवाली सराटीत बोलावलं आहे..

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहे...

तरीदेखील जरांगे पाटील या बैठकीला हजर राहणार असून या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे...

Nalasopara: नालासोपाऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन, ३६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

नालासोपारा-

नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करून ३६ लाखाचे कोकेन अमली पदार्थ जप्त

मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास परिमंडळ दोन च्या क्षेत्रातील दहा टीम ने एकत्र कोम्बिंग ऑपरेशन करून

एका नायजेरियन व्यक्तीच्या घरातून हे कोकेन पकडले आहेत.

या कारवाहित ७३ ग्रॅम वजनाचे ३६ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त करून नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सद्या हे कोकेन कुठून आले, कुठे विकल्या जाणार होते याचा सर्व तापास तुळींज पोलीस करीत आहेत.

Navi Mumbai: कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग ऑक्टोबर २०२७ पर्यंत होणार सुरू

कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग ऑक्टोबर २०२७ पर्यंत होणार सुरू

रेल्वे मार्गाचे ७० टक्के मकाम पूर्ण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com