Rohit Sharma  Twitter
Sports

K Srikanth On Rohit Sharma: 'हा तर 'नो हिट शर्मा',मी प्लेइंग 11 मध्ये ही..' दिग्गजाची हिटमॅनवर बोचरी टीका

Rohit Sharma: माजी क्रिकेटपटूने रोहित शर्माला थेट 'नो हिट शर्मा' असे म्हटले आहे.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघर्ष करताना दिसून येतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना तोंडावर असताना रोहितची निराशाजनक कामगिरी भारतीय फॅन्सची चिंता वाढवत आहे.

या हंगामात त्याची सरासरी २० पेक्षाही कमी आहे. चेन्नई विरुध्द झालेल्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान या निराशाजनक कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटूने रोहित शर्माला थेट 'नो हिट शर्मा' असे म्हटले आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरतोय. त्याची ही कामगिरी पाहता कृष्णमचारी श्रीकांतने (K Srikanth) त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला. त्यावेळी कृष्णमचारी श्रीकांत समालोचन करत होते.

समालोचन करताना त्यांनी रोहितला नो हिट शर्मा असे म्हटले. ते म्हणाले की, "रोहितने आता त्याचं नाव बदलून नो हिट शर्मा असं करून घ्यावं. मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असतो. तर त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान नसतं दिलं. (Latest sports updates)

रोहितच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद...

आयपीएल कारकिर्दीत रोहित शर्मा १६ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. या बाबतीत त्याने मंदिप सिंग, दिनेश कार्तिक आणि सुनील नरेन यांना मागे टाकलं आहे. तर कर्णधार म्हणून शून्यावर बाद होण्याची ही रोहितची ११ वी वेळ आहे.

चेन्नई विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने तिसऱ्याच षटकात पॅव्हे लियलनची वाट धरली. दीपक चाहरने त्याला स्लोवर चेंडू टाकला. ज्यावर त्याने लॅप शॉट मारला. मात्र हा प्रयत्न फसला, कारण गलीत क्षेत्ररक्षण करत असलेल्या रवींद्र जडेजाने सोपा झेल टिपला.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने या डावात चेन्नईला विजयासाठी १४० धावांचे आव्हान दिले होते.

हे आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी अवघ्या १७.४ षटकात पूर्ण करत जोरदार विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT