nigeria cricket team twitter
Sports

U-19 Womens T20 WC: नवख्या नायजेरियाने रचला इतिहास! बलाढ्य न्यूझीलंडचा २ धावांनी पराभव; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार

Nigeria Women U19 Beat New Zealand Women: आयसीसी अंडर १९ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत नायजेरिया संघाने इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी महिला अंडर १९ वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सुरुवातीच्या टप्प्यातच न्यूझीलंडला कधीही न पचणारा धक्का दिला आहे. जगातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंडला नवख्या नायजेरियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह नायजेरिया संघाने इतिहास रचला आहे. अटितटीच्या लढतीत नायजेरियाने न्यूझींलडच्या २ धावांनी पराभव केला.

या स्पर्धेत न्यूझीलंड आणि नायजेरिया या दोन्ही संघांचा ग्रुप सी मध्ये समावेश करण्यात आला आहे. दोन्ही संघ आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात आले होते. न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे नायजेरियाचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं.

या सामन्यात न्यूझीलंडचा विजय स्पष्टपणे दिसून येत होता. मात्र नाजजेरियाच्या गोलंदाजांनी असे काही फासे टाकले की पूर्ण गेम फिरला. फ्रंटफूटवर असलेला न्यूझीलंडचा संघ अचानक बॅकफूटवर गेला. या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे २०-२० षटकांचा सामना अवघ्या १३-१३ षटकांचा खेळवण्यात आला. नायजेरियाचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. नायजेरियाचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला.

प्रथम फलंदाजी करताना नायजेरियाला १३ षटकअखेर ६ गडी बाद ६५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी अवघ्या ६६ धावा करायच्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंड संघासाठी मोठं नव्हतं. मात्र न्यूझीलंडला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती.

न्यूझीलंडला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी ९ धावा करायच्या होत्या. मात्र न्यूझीलंडला अवघ्या ६ धावा करता आल्या. न्यूझीलंडच्या डावात ६३ धावांवर पूर्णविराम लागला यासह नायजेरियाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT