
न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू केन विलियम्सनने टी -२० वर्ल्डकप फ्लॉप कामगिरी केल्यानंतर संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याच्या जागी अनुभवी अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरची व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
सँटनर देखील न्यूझीलंडच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याला न्यूझीलंड संघासाठी १०० हून अधिक वनडे आणि टी -२० सामने खेळण्याचा अनुभव आहे. आता तो या संघाचं टेन्शन नेतृत्व करताना दिसून येईल.
संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर मिचेल सँटनरला प्रचंड आनंद झाला आहे. आपली प्रतिक्रिया देत तो म्हणाला, ' राष्ट्रीय संघाचं नेतृत्व करणं ही अभिमानाची बाब आहे. लहानपणी न्यूझीलंड संघाकडून खेळण्याचं स्वप्नं पाहिलं होतं. आता दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही अभिमानास्पद बाब आहे.
सँटनरने यापूर्वीही न्यूझीलंडच्या पार्ट टाईम कर्णधाराची जबाबदारी पार पाडली आहे. त्याने ४ सामन्यांमध्ये या संघाचं नेतृत्व केलं आहे. या संघाचं नेतृत्व करताना त्याला केवळ १ सामना जिंकून दिला आहे.
तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी -२० क्रिकेटमध्ये त्याला २४ सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १३ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव पार पडला. या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला २ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.
न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड यांनी कर्णधारपद सोपवण्याचं कारणही सांगितलं आहे. ते म्हणाले, ' टॉम लेथम हा न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट नेतृत्व केलं आहे.
त्याने ऑक्टोबरमध्ये संघाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तो चांगली कामगिरी करतोय. आम्हाला असं वाटतंय, त्याने आपलं संपूर्ण लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रित करावं.' टॉम लेथमला कसोटी संघाचं नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रित करता यावं, म्हणून वनडे आणि टी -२० संघाची जबाबदारी सॅंटनरकडे देण्यात आली आहे. आता कर्णधार म्हणून तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.