Pak vs NZ  X
Sports

PAK vs NZ Match Highlights : न्यूझीलंडने पाकिस्तानला मायभूमीत लोळवळं; किवींच्या भेदक गोलंदाजीपुढे बाबर-रिझवानची सेना ढेर

PAK vs NZ Match News : न्यूझीलंडने पाकिस्तानला मायभूमीत लोळवळं आहे. किवींच्या भेदक गोलंदाजीपुढे बाबर-रिझवानची सेना ढेर झाली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे.

Vishal Gangurde

PAK vs NZ Match Highlights, ICC Champions trophy 2025: कर्णधार मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानची सेना न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे ढेर झाली. न्यूझीलंडने पाकिस्तानला ६० धावांनी धूळ चारली आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियमध्ये हा सामना झाला.

न्यूझीलंडने पाकिस्तानला ३२१ धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताला ८ धावांवर पहिला धक्का बसला. सऊद शकील १९ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. सऊदला ओ'रुरकेने झेल बाद केला. त्याचा झेल मॅट हेनरीने घेतला. तर पाकिस्तानला दुसरा झटका २२ धावांवर बसला. कर्णधार मोहम्मद रिझवान १४ धावांत ३ धावा करून झेल बाद झाला. त्यालाही ओ'रुरकेने बाद केले.

दोन विकेट गेल्यानंतर पाकिस्तानने डाव सावरला. त्यानंतर ६९ धावांवर पाकिस्तानला तिसरा मोठा धक्का बसला. फखर जमाला मायकल ब्रेसवेलने बाद केलं. फखर ४१ चेंडूत २४ धावांवर बाद झाला. सलमान आगाने ४२ धावा केल्या. मात्र त्याला संघाचा डाव सावरता आला नाही. तेय्यब ताहिर देखील अवघ्या एका धावावर बाद झाला.

पाकिस्तनचे १५३ धावांवर सहा गडी बाद झाले होते. बाबर आझमही अर्धशतक केल्यानंतर बाद झाला. बाबरने ९० चेंडूत ६४ धावा कुटल्या. बाबरला ६४ धावांवर मिचेलने बाद केले. त्यानंतर पाकिस्तानला ७ वा धक्का शाहीन आफ्रिदीच्या रुपात बसला. शाहीन १४ धावांवर बाद झाला.

पाकिस्तानला मोठा झटका २२९ धावांवर बसला. पाकिस्तानला ८ वा धक्का खुशदिल शाहच्या रुपात बसला. खुशदिलने ४९ चेंडूत ६९ धावा कुटल्या. त्यानंतर बाद झाला. यानंतर न्यूझीलंड संघाने पाकिस्तान संघाला २६० धावांवर गुंडाळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT