New Zealand Cricket kane williamson  
Sports

New Zealand Cricket: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा करार जाहीर; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनवणाऱ्या केन विल्यमसनलाच केलं ऑऊट

New Zealand Cricket Kane Williamson : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करार जाहीर केलाय. बोर्डाने 2024-25 हंगामासाठी एकूण 20 खेळाडूंसोबत करार केलाय. या करारात रचिन रवींद्रला संधी मिळाली तर केन विल्यमसनला या करारातून बाहेर केलंय.

Bharat Jadhav

न्यूझीलंड क्रिकेट म्हणजेच NZC ​​ने 2024-25 हंगामासाठी केंद्रीय करार जाहीर केलाय. या करारात मोठा बदल झाला असून याचा अनेकांना धक्का बसलाय. भारतीय वंशाचा क्रिकेटपटू रचिन रवींद्रचा न्यूझीलंडच्या केंद्रीय करारात स्थान देण्यात आले आहे. तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनवणाऱ्या आणि ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पोहोचवणाऱ्या विलिम्यसनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. दरम्यान रचिन रवींद्रने एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचा करारात समावेश करण्यात आलाय.

रचिन रवींद्रने गेल्या मोसमात ५७८ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमामंकावर होता. भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. आयपीएल 2024 पूर्वी रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्जने 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले होते. याशिवाय ICC ने 2023 साठी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार त्याला दिला होता.

सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. रचिन शिवाय इतर तीन खेळाडूंसोबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने करार केलाय. यामध्ये बेन सियर्स, विल ओ'रुर्के आणि जेकब डफी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय कसोटी स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज एजाज पटेलचा करारही वाढवण्यात आलाय.

तर ज्याने टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनवलं त्याला करारातून बाहेर काढण्यात आलंय. केन विल्यमसनने अनेकवेळा न्यूझीलंड संघाचं कर्णधारपद भुषवलं होतं. 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्याने न्यूझीलंडचे नेतृत्व केलं होतं. त्याने संघाला अंतिम फेरीत नेले आणि प्रक्रियेत टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. नोव्हेंबर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT