NADA bans 8 Indian athletes, including Summi Kaliraman, over doping charges. saam tv
Sports

NADA Action: भारताला मोठा धक्का! एकाचवेळी NADA कडून ८ खेळाडूंवर बंदी

NADA Ban 8 Olympics and Asian Games Athletes : राष्ट्रीय अँटी डोपिंग संस्थेने भारतातील ८ खेळाडूंना मोठा धक्का दिला आहे. या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • नाडाने ८ भारतीय खेळाडूंवर बंदी घातली आहे.

  • स्टार धावपटू सुम्मी कालीरमनवरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली.

  • डोपिंग प्रकरणामुळे भारतीय अॅथलेटिक्सला मोठा धक्का बसला आहे.

ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक खेळाडूंनी भारताला गौरव मिळवून दिलाय. या खेळाडूंना राष्ट्रीय अँटी डोपिंग संस्थेने (नाडा) मोठा धक्का दिलाय. नाडाने एकूण ८ भारतीय खेळाडूंवर बंदी घातलीय. या यादीत सुम्मी कालीरमन सारख्या स्टार खेळाडूंचाही समावेश आहे, ज्यांनी वर्ल्ड अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये ४०० मीटर मिक्स्ड रिलेमध्ये कांस्यपदक जिंकले होतं. (NADA Anti-Doping Panel Bans 8 Indian Athletes Over Clomiphene Use)

NADA ने सुम्मीवर दोन वर्षांची बंदी घातलीय. २०२४ मध्ये केलेल्या डोपिंग गुन्ह्यासाठी NADA अँटी-डोपिंग शिस्तपालन पॅनेल (ADDP) ने त्याच्यावर ही बंदी घालण्यात आलीय. २२ वर्षीय सुम्मीच्या शरीरात प्रतिबंधित क्लोमीफीन पदार्थ आढळून आल्याने नाडाने त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.

या स्टार खेळाडूंवर बंदी

नाडाच्या एडीडीपी ट्रॅक अँड फील्डमधील इतर खेळाडूंमध्ये, लांब पल्ल्याच्या धावपटू श्रीराग ए एस आणि रेश्मा दत्ता केवटे यांच्यावरही बंदी घालण्यात आलीय. श्रीरागवर ५ वर्षांची आणि रेश्मावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आलीय. ट्रॅक अँड फिल्ड व्यतिरिक्त, इतर काही खेळांच्या खेळाडूंनाही नाडाने कारवाई केलीय. यामध्ये वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि कुस्ती खेळातील काही खेळाडूंचा समावेश आहे.

वेटलिफ्टर सिमरनजीत कौरवर डोपिंगच्या गुन्ह्यांसाठी पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. तर बॉक्सर रोहित चमोलीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलीय. पैलवान आरजूवरही चार वर्षांची बंदी घालण्यात आलीय. कबड्डीपटू मोहित नांदलवरही चार वर्षांची बंदी घालण्यात आलीय. कुस्तीपटू अनिरुद्ध अरविंदवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT